जम्मू विमानतळावर पाच मिनिटांत दोन स्फोट

जम्मू: जम्मू विमानतळ परिसरातील तांत्रिक विभागात पाच मिनिटांत दोन स्फोट झाले आहेत. शनिवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास हे दोन स्फोट झाले. या स्फोटात दोन जण जखमी झाले असून त्यांना सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बॉम्ब निकामी करणारं पथक आणि फॉरेन्सिक पथक खबरदारी म्हणून घटनास्थळी दाखल झाले आहेत. या स्फोटाचा आवाज खूप दूरपर्यंत ऐकायला गेला […]

जम्मू विमानतळावर पाच मिनिटांत दोन स्फोट

जम्मू: जम्मू विमानतळ परिसरातील तांत्रिक विभागात पाच मिनिटांत दोन स्फोट झाले आहेत. शनिवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास हे दोन स्फोट झाले. या स्फोटात दोन जण जखमी झाले असून त्यांना सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बॉम्ब निकामी करणारं पथक आणि फॉरेन्सिक पथक खबरदारी म्हणून घटनास्थळी दाखल झाले आहेत. या स्फोटाचा आवाज खूप दूरपर्यंत ऐकायला गेला असल्याची माहिती मिळत आहे.

याच परिसरात भारतीय हवाई दलाचे मुख्यालय तसेच जम्मूचे मुख्य विमानतळही आहे. स्फोटानंतर परिसरात भीतीचं वातावरण असून घटनास्थळी हवाई दल, भारतीय सेना आणि पोलिस अधिकारी दाखल झाले आहेत. आम्ही या प्रकरणाचा वेगाने तपास करीत आहोत आणि लवकरच सत्य समोर येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number