एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी

शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष टोकाला असल्याचे चित्र असताना नागपुरातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले होते. मात्र, शुक्रवारी महालातील चितारोळ परिसरात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ फलक लावण्यात आले. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापासून ४०० मीटरच्या आत हा परिसर येतो. खरंतर नागपूरमध्ये शिवसेनेची ताकद नाही अशातही एकनाथ शिंदेच्या […]

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी

शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष टोकाला असल्याचे चित्र असताना नागपुरातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले होते. मात्र, शुक्रवारी महालातील चितारोळ परिसरात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ फलक लावण्यात आले. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापासून ४०० मीटरच्या आत हा परिसर येतो. खरंतर नागपूरमध्ये शिवसेनेची ताकद नाही अशातही एकनाथ शिंदेच्या समर्थनार्थ बॅनर लागल्याने सर्वांचे डोळे उंचावले आहे.

शिवसैनिकांचा पाठिंबा

शहरी भागानंतर आता ग्रामीण भागातही शिंदे समर्थकांकडून बॅनर बाजी करत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दर्शविण्याचा बॅनर नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील निफाड फाट्यावर झळकला आहे. या बॅनरबाजीमुळे शहरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. मराठा युवा महाराष्ट्र परिषदेतर्फे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. शिवडी जवळील फ्रीवे वर हा भला मोठा बॅनर एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लावण्यात आला आहे. धर्मवीर या चित्रपटामधील वाक्यांचे आशय घेऊन बॅनर जिथे धर्म आहे तिथे विजय निश्चित आशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number