Crime News : सामान पॅकिंगच्या बहाण्याने घरी बोलावून पीएचडीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; आरोपी डिलिव्हरी बॉयला अटक

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून एका डिलिव्हरी बॉयने पीएचडी करणाऱ्या 31 वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार केला. ही घटना 12 जुलै रोजी रात्री घाटी परिसरातील क्वार्टरमध्ये घडली. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आरोपी दीपक मधुकर भुक्तार (35, रा. घाटी क्वार्टर, ह.मु. पडेगाव) याला अटक केली आहे. हेही वाचा : Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर […]

Crime News : सामान पॅकिंगच्या बहाण्याने घरी बोलावून पीएचडीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; आरोपी डिलिव्हरी बॉयला अटक

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून एका डिलिव्हरी बॉयने पीएचडी करणाऱ्या 31 वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार केला. ही घटना 12 जुलै रोजी रात्री घाटी परिसरातील क्वार्टरमध्ये घडली. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आरोपी दीपक मधुकर भुक्तार (35, रा. घाटी क्वार्टर, ह.मु. पडेगाव) याला अटक केली आहे.

हेही वाचा : Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर थरारक अपघात; डिव्हायडर तोडून कंटेनरची ट्रकला जोरदार धडक, वाहतूक ठप्प

संशोधन करणाऱ्या तरुणीची 2 महिन्यांपूर्वी आरोपी दीपक याच्याशी सोशल मीडियावर ओळख झाली. त्यानंतर त्यांची मैत्री झाली. आरोपी घाटीतील क्वार्टर्समध्ये राहायचा. त्याला खोली रिकामी करण्यास सांगितले. त्यामुळे त्याने 8 जुलै रोजी सायंकाळी सामान पॅक करण्यासाठी पीडितेला बोलावले. रात्री उशीर झाल्याने ती तिथेच थांबली. रात्री दीपकने तिच्याशी चांगले वर्तन केले. त्यानंतर त्याने 12 जुलै रोजी उर्वरित सामान पॅक करण्यासाठी बोलवले आणि रात्री तिच्यावर 2 वेळा अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी, 13 जुलै रोजी सकाळी 7 वाजता त्याने तिला बळजबरीने एक गोळी खाऊ घातली. नंतर समतानगर येथील खोलीवर नेऊन सोडले. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number