एसटी कर्मचाऱ्यांनी मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी

एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. दरम्यान गेला दीड महिना संपावर असलेल्या अलिबाग एसटी आगारातील कर्मचारी स्वेच्छा मरणाच्या मानसिकतेत आहेत. राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. राज्य सरकारने वेतनवाढ दिली असली तरी विलिनीकरणाबाबत निर्णय़ घेतलेला नाही.त्या मुळे अलिबाग मधील २७० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा मरणाला परवानगी द्या अशी […]

एसटी कर्मचाऱ्यांनी मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी

एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. दरम्यान गेला दीड महिना संपावर असलेल्या अलिबाग एसटी आगारातील कर्मचारी स्वेच्छा मरणाच्या मानसिकतेत आहेत. राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. राज्य सरकारने वेतनवाढ दिली असली तरी विलिनीकरणाबाबत निर्णय़ घेतलेला नाही.त्या मुळे अलिबाग मधील २७० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा मरणाला परवानगी द्या अशी मागणी त्यांनी राज्यसरकारकडे केली आहे.

अलिबाग आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इ-मेलद्वारे पत्र लिहिले आहे. सरकारकडून होणाऱ्या पिळवणुकीला कंटाळलो असून मानसिक दडपणाखाली असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.

अकोल्यात कर्मचाऱ्यांची स्वेच्छा मरणाची मागणी

अकोला जिल्ह्यात गेल्या ५२ दिवसापासून दुखवटा पाळत आहे. एसटी कर्मचारी हा विलीनीकरणासाठी ५२ दिवसापासून सरकारला रोज कोणत्या-न्-कोणत्या मार्गे एसटीचे विलीनीकरण करण्यात यावे यासाठी सरकारला मागणी करत आहे. पण आज पर्यंत ऐकून ६० एसटी कर्मचयाऱ्याच्या आत्महत्या झाल्या तरीही हे सरकार अजूनही झोपलेले आहे. आमच्याही मनात आत्महत्या कराव्या अशे विचार येतात. मात्र आत्महत्या करणे हे कायद्याने गुन्हा आहे. आंदोनल आणि निवेदन देऊनही आम्हाला योग्य प्रतिसाद मिळत नाही. म्हणूनच आम्ही कुठल्याही दबावमध्ये न येता स्वेच्छा मरणाची परवानगी मागत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number