सर्वाोच्च न्यायालयाने निर्भया प्रकरणातील गुन्हेगार असलेल्या पवनची याचिका फेटाळली आहे.
गुन्हेगार पवनने दिल्ली न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
निर्भया प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा मी अल्पवयीन असल्याचा दावा पवनने केला होता. त्यामुळे मला फाशीची शिक्षा होऊ नये, अशी याचिका त्याने सर्वोच्च न्यायालयात केली होती.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे.
निर्भया प्रकरणातील ४ ही आरोपींना १ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येणार आहे.
या ४ ही गुन्हेगारांचे डेथ वॉरंट दिल्ली न्यायालयाने काढलं आहे.