Pankaj Tripathi Brothers Attack: धक्कादायक! पंकज त्रिपाठींच्या भावावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला, समोर आली मोठी अपडेट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलसंड तिवारी टोला येथे 21 जून रोजी विजयेंद्र नाथ तिवारी यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला.

Pankaj Tripathi Brothers Attack: धक्कादायक! पंकज त्रिपाठींच्या भावावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला, समोर आली मोठी अपडेट

बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या मोठ्या भावाबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्याचे मोठे भाऊ, विजयेंद्र नाथ तिवारी, कुऱ्हाडीने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात जमिनीच्या वादातून पंकज त्रिपाठी यांच्या मोठ्या भावावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलसंड तिवारी टोला येथे 21 जून रोजी जमिनीच्या वादावरून विजयेंद्र नाथ तिवारी यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. ही माहिती मिळताच एसडीपीओ आणि माधवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी (SHO) घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला.

हेही वाचा – Sukrut Deo In IGL Season 2 : जिंकलसं भावा! शर्वरीची मिठी, आलियाची सेल्फी, समय रैनाचं गिफ्ट…सोबतचं सुकृतने रातोरात कमावले फॉलोअर्स 

या हल्ल्यात अभिनेत्याचा भाऊ गंभीर जखमी झाला; त्यानंतर विजयेंद्रनाथ तिवारी यांना सुरुवातीला गोपालगंज सदर रुग्णालयात नेण्यात आले. तिथून त्यांना पुढील उपचारांसाठी पाटण्याला हलवण्यात आले. डॉक्टरांच्या मते, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आणि नियंत्रणात आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number