Kotak Mahindra Bank Case: बँकेत 160 कोटींच्या एफडी, पण खात्यात मात्र ‘शून्य’ रुपये; कोटक महिंद्रा बँकेच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?

कोटक महिंद्रा बँकेतील काही अधिकाऱ्यांवर बनावट खाती उघडून निधी वळवण्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Kotak Mahindra Bank Case: बँकेत 160 कोटींच्या एफडी, पण खात्यात मात्र ‘शून्य’ रुपये; कोटक महिंद्रा बँकेच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?

हरियाणामध्ये आर्थिक गैरव्यवहाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून पंचकुला महानगरपालिकेच्या निधीशी संबंधित मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. महानगरपालिकेच्या तब्बल 160 कोटी रुपयांच्या मुदतठेवींमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप कोटक महिंद्रा बँकेच्या काही अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. बनावट खाती उघडून या रकमांची दुसरीकडे वळवणूक केल्याचा आरोप होत असून, या प्रकरणामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंचकुला महानगरपालिकेने विविध प्रकल्पांसाठी निधी सुरक्षित ठेवण्यासाठी कोटक महिंद्रा बँकेत मोठ्या प्रमाणात मुदतठेवी केल्या होत्या. मात्र, या ठेवी प्रत्यक्ष खात्यांमध्ये न ठेवता बनावट खात्यांमध्ये हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. बँकेकडून महानगरपालिकेला केवळ कागदोपत्री नोंदी देण्यात येत होत्या, अशीही गंभीर बाब समोर आली आहे.

या गैरव्यवहाराचा पर्दाफाश तेव्हा झाला, जेव्हा महानगरपालिकेने 58 कोटी रुपयांच्या एका मुदत ठेवीची मुदतपूर्ती झाल्यानंतर ती रक्कम खात्यात जमा करण्याची विनंती केली. बँकेकडून दिलेल्या खात्याच्या स्टेटमेंटमध्ये रक्कम ट्रान्सफर झाल्याचे दाखवण्यात आले; मात्र प्रत्यक्षात महानगरपालिकेच्या खात्यात एकही रुपया जमा झाला नव्हता. पुढील चौकशीत हे स्टेटमेंटही बनावट असल्याचे उघड झाले.

हेही वाचा: 8th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर? पगार आणि पेन्शनमध्ये 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीची शक्यता

यानंतर महानगरपालिकेने इतर मुदतठेवींची पडताळणी करण्यास सांगितले असता आणखी धक्कादायक माहिती समोर आली. बँकेकडून देण्यात आलेल्या सर्व कागदोपत्री बनावट असल्याचे स्पष्ट झाले आणि संबंधित खात्यांमध्ये कोणतीही रक्कम अस्तित्वात नसल्याचे आढळले. या प्रकरणात बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे दीर्घकाळ हा गैरव्यवहार लपवून ठेवला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर पंचकुला महानगरपालिकेने बँकेविरोधात FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच हरियाणा सरकारला पत्र पाठवून संबंधित बँकेला अधिकृत यादीतून वगळण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात केवळ बँकेचे कर्मचारीच नव्हे तर महानगरपालिकेतील काही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी पुढे जात असताना आणखी धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमधून जगाला दिला 'हा' धक्कादायक संदेश; म्हणाले 'इराण आता अमेरिकेला…'

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number