कोयंबतूर : गुरुवार संध्याकाळपासून बेपत्ता असलेली एक 10 वर्षांची मुलगी शुक्रवारी तामिळनाडूच्या कोयंबतूरमधील सुलूर भागातील कन्नमपलयम तलावाजवळ मृत अवस्थेत आढळली. तिच्या शरीरावर जखमा होत्या. मुलीचे अपहरण करून नंतर तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, सुलूर भागातील आपल्या घराजवळ किराणा सामान खरेदी करण्यासाठी मुलगी बाहेर गेली असताना आरोपींनी तिचे अपहरण करून नंतर तिची हत्या केली. आरोपींची ओळख कार्तिक आणि मोहन राज अशी पटली आहे. या घटनेनंतर मुलीच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी न्यायाच्या मागणीसाठी सुलूर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले.
या प्रकरणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी म्हटले आहे की, अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. “काल कोईम्बतूरमध्ये एका 10 वर्षांच्या मुलीसोबत घडलेल्या भीषण घटनेमुळे प्रचंड दुःख आणि धक्का बसला आहे. अशी अमानवीय आणि अक्षम्य गुन्हेगारी कृत्ये आपल्या समाजात कधीही सहन केली जाणार नाहीत,” असे त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले. पीडितेच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन मिळेपर्यंत शवागारातून मृतदेह घेण्यास नकार दिल्यानंतर विजय यांनी ही प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्र्यांकडून कोणतेही निवेदन मिळेपर्यंत आम्ही मृतदेह घेणार नाही. आम्ही बदलासाठी मतदान केले. आता ते कोणतेही निवेदन किंवा आश्वासनही देत नाहीत. यावरून हे दिसून येते की, नवीन सरकार आल्यानंतरही कोणताही बदल होणार नाही,” असे त्या एएनआयला म्हणाल्या.
तामिळनाडूचे पोलीस महासंचालक संदीप राय राठोड यांनीही या प्रकरणातील तपासाचा आढावा घेण्यासाठी कोईम्बतूरला धाव घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरून डीएमकेने नवीन टीव्हीके सरकारवर टीका केल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले असताना, टीव्हीकेच्या नेत्यांनी रुग्णालयात पीडित कुटुंबाची भेट घेऊन न्यायाचे आश्वासन दिले. तामिळनाडूचे मंत्री एम. एस. संपत यांनी ईएसआय रुग्णालयाला भेट देऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबाला भेटल्यानंतर संपत म्हणाले की, त्यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून तपास सुरू आहे. “आरोपींना कठोरतम शिक्षा दिली जाईल,” असेही ते म्हणाले.
सुलूर मतदारसंघाचे नवनिर्वाचित टीव्हीके आमदार एन. एम. सुकुमार यांनीही रुग्णालयात पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी दोषींना शिक्षा देण्याचे आश्वासन दिले. विरोधी पक्ष डीएमकेने विजय यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारवर जोरदार हल्ला चढवला असून, नवीन सरकारने पदभार स्वीकारल्यापासून गेल्या 12 दिवसांत राज्यात गुन्हेगारीचा आलेख वाढला असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, नवीन सरकारने पदभार स्वीकारल्याच्या 12 दिवसांत घडलेल्या गुन्हेगारीच्या 30 मोठ्या घटनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री विजय
काल कोईम्बतूरमध्ये एका 10 वर्षांच्या मुलीसोबत घडलेल्या भीषण घटनेमुळे प्रचंड वेदना आणि धक्का बसला आहे. अशी अमानवीय आणि अक्षम्य गुन्हेगारी कृत्ये आपल्या समाजात कधीही सहन केली जाणार नाहीत.आपल्या प्रिय मुलीला गमावल्याच्या दुःखात असलेल्या त्या लहान मुलीच्या कुटुंबीयांप्रति मी माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो.या प्रकरणाशी संबंधित दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मी पोलिसांना या घटनेचा सखोल आणि जलदगतीने तपास करून तात्काळ आरोपपत्र दाखल करण्यासाठी सर्व आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. महिला आणि मुलांविरुद्ध अशा घृणास्पद कृत्यांमध्ये सहभागी होणाऱ्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी, यासाठी तामिळनाडू सरकार कठोर कारवाई करेल. यासाठी सर्व तात्काळ आणि आवश्यक कारवाई केली जाईल.
கோயம்புத்தூரில் நேற்று 10 வயது சிறுமிக்கு நிகழ்ந்த கொடூர சம்பவம் மிகுந்த வேதனையையும், அதிர்ச்சியையும் அளிக்கிறது. இத்தகைய மனிதநேயமற்ற மற்றும் மன்னிக்க முடியாத குற்றச் செயல்கள் நமது சமூகத்தில் ஒருபோதும் ஏற்றுக்கொள்ளப்பட முடியாது. தங்கள் உயிருக்குயிரான குழந்தையைப் பிரிந்து வாடும்… — CMOTamilNadu (@CMOTamilnadu) May 23, 2026
दरम्यान, शनिवारी दुपारी त्या 1o वर्षीय मुलीचा मृतदेह शवविच्छेदनानंतर ईएसआय रुग्णालयाच्या शवागारातून बाहेर आणण्यात आला. तिचा मृतदेह सुलूर भागातील कन्नमपलयम तलावाजवळ सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.
#WATCH | Coimbatore, Tamil Nadu: Body of the 10-year-old girl who was abducted and murdered brought out of the ESI Hospital mortuary after autopsy. Her body was discovered near the Kannampalayam tank in the Sulur area. Police have arrested two individuals in connection with the… pic.twitter.com/x4b489WrLL — ANI (@ANI) May 23, 2026