मलेरियाच्या महाराष्ट्रातील ८०४० पैकी २९८५ रुग्ण मुंबईत

मुंबई, १९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : पावसाळा सुरू होताच महाराष्ट्रात मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या महाराष्ट्रात मलेरियाचे ८०४० रुग्ण आहेत. यापैकी २९८५ मलेरियाचे रुग्ण हे मुंबईत आहेत. राज्यातील एकूण मलेरिया रुग्णांमध्ये मुंबईतील रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील एकूण मलेरिया रुग्णांमध्ये मुंबईतील रुग्णांचे प्रमाण ३६.५ टक्के आहे. डास चावल्याने मलेरिया होतो. हे टाळण्यासाठी राहते […]

मलेरियाच्या महाराष्ट्रातील ८०४० पैकी २९८५ रुग्ण मुंबईत

मुंबई, १९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : पावसाळा सुरू होताच महाराष्ट्रात मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या महाराष्ट्रात मलेरियाचे ८०४० रुग्ण आहेत. यापैकी २९८५ मलेरियाचे रुग्ण हे मुंबईत आहेत. राज्यातील एकूण मलेरिया रुग्णांमध्ये मुंबईतील रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील एकूण मलेरिया रुग्णांमध्ये मुंबईतील रुग्णांचे प्रमाण ३६.५ टक्के आहे.

डास चावल्याने मलेरिया होतो. हे टाळण्यासाठी राहते ठिकाण, काम करण्याचे ठिकाण तसेच भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवून डासांचा प्रादूर्भाव टाळणे हा एक उपाय आहे. कुठेही अस्वच्छता राहणार नाही, पाणी साठून राहणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. हे उपाय करून डासांचा प्रादूर्भाव टाळणे शक्य आहे. तसेच डास चावू नये यासाठी शरीराला डास प्रतिबंधक मलम लावणे, मच्छरदाणीचा वापर करणे असे उपाय पण करता येतात.

मलेरिया झाला तर त्याची लक्षणे ओळखून तातडीने त्यावर वैद्यकीय उपाय केले तर हा आजार लवकर बरा होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मलेरिया झाला तर अनेकदा ताप येतो, थंडी वाजू लागते, अंगदुखीचा त्रास होतो. सलग दोन-तीन दिवस किंवा एक दिवसाआड या पद्धतीने दोन ते तीन वेळा तापाची पुनरावृत्ती झाली तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे हिताचे. उपचारांना दिरंगाई झाली तर हा आजार तब्येतीला घातक ठरू शकतो. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने केले आहे.

डेंग्यूचा उद्रेक

डोळ्यांच्या साथीपाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगर शहरात डेंग्यूचा उद्रेक वाढत आहे. मागील १८ दिवसांत शहराच्या विविध भागांमध्ये डेंग्यूचे १२ रुग्ण आढळून आले आहेत. तर तापाचे ५९ जण संशयित आहे.शहरात कधी ढगाळ तर कधी ऊन असे वातावरण आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number