राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बीडच्या परळीमधील न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. २००८साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये परिवहन मंडळाच्या बसवर दगडफेक केल्याप्रकरणी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. परळीमधील एका बसवर दगडफेक केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर चार्जशीट दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी सर्व आरोपींना जामीन मिळाला होता. मात्र जामीन […]

राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बीडच्या परळीमधील न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. २००८साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये परिवहन मंडळाच्या बसवर दगडफेक केल्याप्रकरणी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे.

परळीमधील एका बसवर दगडफेक केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर चार्जशीट दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी सर्व आरोपींना जामीन मिळाला होता. मात्र जामीन मिळूनदेखील सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे.

२००८साली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. राज ठाकरेंना अटक केल्याचे पडसाद राज्यात उमटले होते. अनेक ठिकाणी तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. याप्रकरणी ओरोपींना जामीन मिळाला होता, मात्र ते गैरहजर राहिल्यामुळे परळी न्यायालयाने राज ठाकरे यांना अजामीनपात्र वॉरट जारी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number