Delhi Blast Update: दिल्ली स्फोट प्रकरणात इरफान मुख्य सूत्रधार; ब्रेनवॉश करायचा आणि…

एनआयएने लाल किल्ला ब्लास्ट प्रकरणातील मुख्य दुवा मौलवी इरफानला शोपियांतून अटक केली. डॉक्टर मुजम्मिल, अदिल आणि इतरांना त्याने ब्रेनवॉश करून दहशतवादी मॉड्युलमध्ये सामील केल्याचे कबुल झाले.

Delhi Blast Update: दिल्ली स्फोट प्रकरणात इरफान मुख्य सूत्रधार;  ब्रेनवॉश करायचा आणि…

नवी दिल्ली: दिल्ली स्फोट प्रकरणात एनआयएने मोठी कारवाई करत या साखळीतील महत्त्वाचा दुवा असलेल्या मौलवी इरफान अहमद वागे याला जम्मू कश्मीरमधील शोपियां येथील एका मशिदीतून अटक केली आहे. या प्रकरणातील आत्मघाती हल्लेखोर उमर बिन तसेच अटक करण्यात आलेले डॉ. मुजम्मिल, डॉ. अदिल अहमद रठार आणि डॉ. आरिफ निसार डार हे सर्व इरफानशी जोडले गेल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. एनआयएच्या चौकशीत मौलवी इरफानने अनेक धक्कादायक माहिती दिली असून त्याने शिक्षित डॉक्टरलाही कशा प्रकारे ब्रेनवॉश करून दहशतवादाच्या मार्गावर नेले, याचे तपशील उघड झाले आहेत.

मौलवी इरफान आपला पहिला टप्पा नेहमी साध्या चर्चेपासून सुरू करायचा. एखाद्या व्यक्तीशी तो धार्मिक किंवा वैचारिक विषयावर संवाद साधत असे आणि त्या व्यक्तीचा कल कोणत्या दिशेने आहे हे ओळखत असे. डॉक्‍टर मुजम्मिल याची ओळखही त्याला रुग्णालयातच झाली. एका साध्या भेटीतून सुरू झालेली ही ओळख लवकरच वैचारिक प्रभावात बदलली आणि काही महिन्यांत मुजम्मिल पूर्णपणे कट्टर बनला. पुढे त्यानेच एक सक्रिय दहशतवादी मॉड्यूल उभे केले.

हेही वाचा: Nana Patole: मुख्यमंत्र्यांच्या मामेबंधूंच्या बिनविरोध विजयानंतर राजकारण तापले; नाना पटोले यांचा हल्लाबोल

इरफानचा दुसरा मार्ग होता सोशल मीडियावर नजर ठेवणे. धार्मिक ताण, अतिवादी विचार किंवा कट्टरपंथाची चिन्हे दिसताच तो त्या व्यक्तीशी संपर्क साधत असे. डॉ. अदिलला दहशतवादी मॉड्युलमध्ये ओढण्याची प्रक्रिया त्याने याच मार्गाने सुरू केली. धार्मिक साहित्य शेअर करणे, विशिष्ट विचार देणे आणि हळूहळू मानसिक प्रभाव टाकणे ही त्याची नेहमीची पद्धत होती. तिसरा टप्पा मस्जिदमध्ये येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्याचा होता. नमाजासाठी वारंवार येणारे, धार्मिक क्रियेतील सहभाग जास्त असणारे लोक त्याच्या ‘टार्गेट’वर असत. अशाच निरीक्षणातून त्याला जसीर अहमद आणि वानी उर्फ दानिश या दोघांविषयी माहिती मिळाली आणि हे दोघे त्याने या मॉड्युलचा भाग बनवले.

तपासात सर्वात मोठा धक्का बसला तो म्हणजे इरफानचे पाकिस्तान कनेक्शन. डिजिटल पुराव्यांमधून त्याचा पाकिस्तानी जैश-ए-मोहम्मदच्या हँडलर हंजुल्लाशी संपर्क असल्याचे स्पष्ट झाले आहे. हंजुल्लानेच स्थानिक जैश दहशतवाद्यांच्या मदतीने डॉ. मुजम्मिलला दोन एके रायफल उपलब्ध करून दिल्या होत्या. यापैकी एक रायफल रुग्णालयातील त्याच्या लॉकरमधून आणि दुसरी शाहीनाच्या कारमधून जप्त करण्यात आली. मौलवी इरफानच्या कबुलीजबाबामुळे दिल्ली ब्लास्ट प्रकरणातील कट्टरवादाचे नेटवर्क किती खोलवर रुजले होते, याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. एनआयए या संपूर्ण मॉड्युलचा तपास पुढे अधिक गतीने करत असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Cyber Fraud : 1000 कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश, पोलिसांची मोठी कारवाई, नेमकं काय घडलं?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number