नवनीत राणा यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना अटक करण्यात आली असून राणा दाम्पत्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांना लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. कोठडीत जनावरांपेक्षा वाईट वागणूक मिळाली असल्याचे नवनीत राणा यांनी पत्रात नमूद केले आहे. नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहित धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांना […]

नवनीत राणा यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना अटक करण्यात आली असून राणा दाम्पत्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांना लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. कोठडीत जनावरांपेक्षा वाईट वागणूक मिळाली असल्याचे नवनीत राणा यांनी पत्रात नमूद केले आहे.

नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहित धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांना कोठडीत जनावरांपेक्षा वाईट वागणूक मिळाली असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी पत्राद्वारे केला आहे. तसेच माझा अमानुषपणे छळ केला जात आहे, तर मी अनुसूचित जातीची असल्यामुळे माझा छळ होत असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी पत्राद्वारे केला आहे.

तसेच त्यांनी लिहिले की, ‘मी पिण्यासाठी पाणी मागितले मात्र, मला रात्रभर पाणी दिले नाही. तसेच आम्हाला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. मी अनुसूचित जातीची असल्यामुळे मला पाणी पिण्याचा मुलभूत अधिकार नाकारण्यात आला.’ असेही त्यांनी पत्रात नमूद केले.

तसेच, माझा उपक्रम मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नसून मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनासुद्धा हनुमान चालीस पठण करण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र, मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून आम्ही हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. मात्र, त्यानंतर आम्हाला कैद करण्यात आले.

नवनीत राणा यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कलम १२४ (अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच राणा दाम्पत्यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला असून राणा दाम्पत्यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

राणा दाम्पत्यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ते मुंबईत दाखल  झाल होते. मात्र, राणा दाम्पत्यांच्या या निर्णयामुळे शिवसैनिक आक्रमक झाल असून त्यांच्या खार येथील घराला चहू बाजूंनी शिवसैनिकांनी घेराव घातला. त्यामुळे त्यांना हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मातोश्रीसमोर पोहचता आले नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे राणा दाम्पत्यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. मात्र, परिणामी राणा दाम्पत्यांना पोलिसांनी अटक केले असून त्यांच्या राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number