Nashik Crime: गरोदर असताना पोटात लाथ मारली, तीन कोटींची खंडणी…; नाशिकमध्ये महिला लोकप्रतिनिधीवर पतीकडूनच अत्याचार

नाशिकमध्ये एका महिला लोकप्रतिनिधीने आपल्या पतीवर शारीरिक व मानसिक छळ, खंडणी मागणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

Nashik Crime: गरोदर असताना पोटात लाथ मारली, तीन कोटींची खंडणी…; नाशिकमध्ये महिला लोकप्रतिनिधीवर पतीकडूनच अत्याचार

नाशिकमध्ये एका महिला लोकप्रतिनिधीवर तिच्याच पतीकडून अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पीडित महिला लोकप्रतिनिधीने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. शारीरिक आणि मानसिक छळासोबतच तब्बल 3 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचाही आरोप तिने तक्रारीत केला आहे.

पीडित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, पतीकडून अनेक दिवसांपासून सातत्याने त्रास दिला जात होता. किरकोळ कारणांवरून वाद घालत मारहाण करणे, धमक्या देणे आणि मानसिक दबाव टाकणे असे प्रकार सुरू होते, असा दावा तिने केला आहे. विशेष म्हणजे, गर्भवती असताना पोटात लाथ मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचाही गंभीर आरोप महिलेने केला आहे.

तसेच संशयिताने इमारतीवरून ढकलण्याचा आणि गळा दाबून हत्या करण्याचाही प्रयत्न केल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे महिला लोकप्रतिनिधी मोठ्या मानसिक धक्क्यात असल्याचे सांगितले जात आहे.

पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित पतीला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आरोपीची चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका लोकप्रतिनिधीलाच अशा प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागत असल्याने विविध स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number