Nashik Crime : भयंकर! तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृणपणे संपवलं

या घटनेनंतर नाशिकसह संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली असून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime : भयंकर!  तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृणपणे संपवलं

सध्या माणूस जनावरासारखा वागायला लागला आहे. क्रूरता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशीच क्रूरता आणि लाजेने मान खाली घालायला लावेल अशी भयानक घटना नाशिकमधील मालेगावमध्ये घडली आहे. एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर नाशिकसह संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली असून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे ३ वर्षांच्या मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होती. या गावामध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणाने चिमुकलीसोबत अत्याचार केले. याबद्दल तिने कोणाला कधी काही सांगू नये म्हणून त्या नराधमाने चिमुरडीच्या  डोक्यात दगड घालून संपवलं. समोर आलेल्या माहितीनुसार, विजय संजय खेरनार असं आरोपी तरुणाचे नाव आहे. विजयने मुलीची हत्या केल्यानंतर तो फरार झाला होता.

मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याने हा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. मुलीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी मालेगाव मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळे नाशिकमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number