Nagpur Crime: संघ मुख्यालयाजवळ मध्यरात्री गोळीबार; नागपूरच्या मध्यवर्ती भागात दहशतीचं वातावरण

नागपूरच्या मध्यवर्ती भागात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Nagpur Crime: संघ मुख्यालयाजवळ मध्यरात्री गोळीबार; नागपूरच्या मध्यवर्ती भागात दहशतीचं वातावरण

नागपूर शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या घटनांनी डोके वर काढल्याचे चित्र दिसत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात रविवारी उशिरा रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे ही घटना संघ मुख्यालयापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर घडल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दुसरीकडे एमआयडीसी परिसरात अवघ्या चार दिवसांच्या अंतरात एकाच ठिकाणी दोन जणांचे दगडाने ठेचून जीव घेतल्याच्या घटनांमुळे नागपूर हादरून गेले आहे.

महाल परिसरातील कोठी रोड भागात रविवारी रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास गोळीबार झाला. प्राथमिक माहितीनुसार, तीन दुचाकींवर आलेल्या सहा जणांनी परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने दोन राऊंड फायरिंग केले. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

या प्रकरणात काही संशयितांची नावे समोर आली असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. अमली पदार्थ विक्री आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. अंतर्गत वाद आणि परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. शहराच्या अत्यंत संवेदनशील भागात अशा प्रकारे गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number