Mumbai Local Train: भयंकर! रेल्वेत महिलांच्याच डब्यातून नराधमाचा प्रवास, उतरण्यास सांगितल्यानं त्यानं तरुणीलाचं धावत्या लोकलमधून फेकले खाली

या प्रकारानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Mumbai Local Train: भयंकर! रेल्वेत महिलांच्याच डब्यातून नराधमाचा प्रवास, उतरण्यास सांगितल्यानं त्यानं तरुणीलाचं धावत्या लोकलमधून फेकले खाली

मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पनवेल–सीएसएमटी मार्गावरील धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात प्रवेश केलेल्या एका पुरुषाने तरुणीला धक्का देऊन थेट धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव शेख अख्तर नवाज असून त्याचे वय सुमारे 50 वर्षे आहे.

आरोपी शेख महिलांच्या डब्यात चढल्यानंतर महिलांनी त्याला वारंवार दुसऱ्या डब्यात जाण्याची विनंती केली, मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. प्रचंड गर्दी असताना तिसऱ्या स्थानकानंतर एका महिलेने त्याला उतरण्यास सांगितले असता आरोपीला राग अनावर झाला आणि त्याने त्या महिलेला जोरात धक्का दिला. धक्का बसताच श्वेता नावाची ही तरुणी थेट ट्रेनच्या बाहेर फेकली गेली आणि गंभीर जखमी झाली.

हेही वाचा: China Gold Deposit: निसर्गाची किमया की तंत्रज्ञानाचा करिश्मा? चीनला समुद्राखाली सापडलं सोन्याचं ‘बेट’!

ही घटना घडताच महिलांच्या डब्यात एकच आक्रोश झाला. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जखमी अवस्थेत पीडित प्रवासी श्वेताने तात्काळ आपल्या वडिलांना फोन करून “मला वाचवा, मी पडले आहे” असे सांगितले. तिच्या वडिलांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत श्वेताचा शोध सुरू केला.

दरम्यान, महिलांच्या आरडाओरडीने काही पुरुष प्रवाशांनी महिलांच्या डब्यात घुसून शेख अख्तर नवाज याला पकडले आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजशी बोलताना प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी सांगितले की, हार्बर मार्गावरील गर्दी दिवसेंदिवस वाढत असून अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. आरोपी आणि जखमी महिला यांची पूर्वी ओळख होती का, तसेच तो यापूर्वीही महिलांच्या डब्यात प्रवास करत होता का, याबाबत विविध शक्यतांवर पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. मुंबई पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून संबंधित स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.

दरम्यान, मुंबई शहरातील लोकलमधील वाढती प्रवासी संख्या, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि दिव्यांग व महिलांच्या डब्यात वारंवार होणारा पुरुषांचा बेकायदेशीर प्रवास यामुळे महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची प्रतिक्रिया अनेक प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना, अधिक पोलिस बंदोबस्त आणि नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

हेही वाचा: BMC Election 2026: जागावाटपावरून ‘मातोश्री’ अन् ‘शिवतीर्थ’मध्ये खलबतं; राज ठाकरेंनी राऊत-परबांना थेट काय सांगितलं?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number