मुंबई: मुंबईत शनिवारी मध्यरात्रीपासूच मुसळधार पावसानं हजेरी लावली. यामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणवार पाणी साचलं. त्यामुळे मुंबईतील सखल भागात राहणाऱ्या नागरिकांचे हाल झाले.
मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील लोकल सेवेलाही बसला. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक सकाळपासून ठप्प झाली होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आधी पश्चिम, नंतर मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मध्य रेल्वेने याबद्दल माहिती दिली आहे.
CR monsoon updates at 11.00am TRAINS on ALL CORRIDORS ARE RUNNING now. Main line : Trains are running Harbor line: Trains have resumed. Trans Harbor line: Trains are running Trains are running on Belapur/Nerul-Kharkopar line. — Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) July 18, 2021
रात्रभर झालेल्या पावसाने मुंबईतील अनेक रस्त्यांबरोबरच रेल्वे रुळ पाण्याखाली गेले. तर अनेक रेल्वे स्थानकांवरही प्रचंड पाणी साचलं होतं. त्यामुळे सकाळी ६ वाजल्यापासूनच रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. पंपद्वारे पाणीउपसा करण्यात आल्यानंतर रेल्वे रुळावरील पाणी कमी झालं. त्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरू झाली. त्यानंतर मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली.