Mumbai Dabbewala Update : मुंबईचे डब्बेवाले चालले सुट्टीवर! जेवणाची सेवा होणार बंद ; मोठं कारण समोर

या सेवेचा जे लाभ घेत आहेत. त्यांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे. 

Mumbai Dabbewala Update : मुंबईचे डब्बेवाले चालले सुट्टीवर!  जेवणाची सेवा होणार बंद ; मोठं कारण समोर

मुंबईतील डबेवाल्यांचा मोठा आधार जनतेला मिळतो. मात्र आता काही दिवस ही सेवा बंद राहणार आहे. मुंबई डबेवाला असोसिएशनकडून 30 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत डबे वितरण सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सेवेचा जे लाभ घेत आहेत. त्यांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे. 

मुंबई डबेवाला असोसिएशनकडून 30 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत डबे वितरण सेवा पूर्णपणे बंद असल्याचे सांगितले आहे. ग्रामदेवतेच्या उत्सवानिमित्त दरवर्षी घेतली जाणारी ही सुट्टी असल्याचं असोसिएशननं सांगितलं आहे. अनेक वर्षांपासून अखंडपणे सेवा देणारे डबेवाले या काळात गावी जाऊन धार्मिक विधी आणि पारंपरिक उत्सवांमध्ये सहभागी होतात.

हेही वाचा- Donald Trump No Kings Protest : अमेरिकेत 'नो किंग्स' आंदोलन पेटलं, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात तीव्र निषेध, लाखो लोक रस्त्यावर 

यामुळे लाखो नोकरदारांना पर्यायी जेवणाची व्यवस्था करावी लागणार आहे. या काळात सेवा बंद असली तरी ग्राहकांनी डबेवाल्यांचा पगार कापू नये, अशी विनंती सोसिएशनकडून करण्यात आली आहे.डबे सेवा बंद असल्यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बाहेरून जेवण मागवणं किंवा घरून वेगळी व्यवस्था करणं आवश्यक ठरणार आहे. अचानक अडचण येऊ नये म्हणून आधीच नियोजन करण्याचा सल्ला दिला  आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number