‘मोहित कंबोज फडणवीसांना बुडवणार’ – संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर निशाणा साधला आहे. मोहित कंबोज हा देवेंद्र फडणवीस यांचा फ्रंटमॅन आहे. आणि तो फडणवीसांना डुबवणार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या काळात २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. पत्रा चाळीची जमीन खरेदी करणारा मोहित कंबोज असल्याचे संजय राऊत म्हणाले. तसेच पीएमसी बँक […]

‘मोहित कंबोज फडणवीसांना बुडवणार’ – संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर निशाणा साधला आहे. मोहित कंबोज हा देवेंद्र फडणवीस यांचा फ्रंटमॅन आहे. आणि तो फडणवीसांना डुबवणार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या काळात २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.

पत्रा चाळीची जमीन खरेदी करणारा मोहित कंबोज असल्याचे संजय राऊत म्हणाले. तसेच पीएमसी बँक घोटाळ्यातही मोहित कंबोज यांचा हात असल्याचे ते म्हणाले. राकेश वधवानकडून मोहित कंबोज यांच्या केबीजी ग्रुपने १२ हजार कोटींची जागा १०० कोटींना घेतली तर अनेक व्यवसायांमध्ये कंबोजच्या केबीजी ग्रुपचे पैसे असून इतके पैसे कुठून आले, हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती असल्याचे संजय राऊत म्हणाले.

फडणवीस काळात मोठा घोटाळा

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाआयटीमध्ये २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. माझ्या ५ हजार कोटींच्या घोटाळ्याची माहिती असल्याचे राऊत म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number