Mumbai Protest Girl Riya Ahir : आंदोलनातील व्हायरल चेहरा, मॉडेल रिया अहिरची पोलिसांत धाव; सोशल मीडियावरील धमक्या आणि आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केली तक्रार

मुंबई : NEET आंदोलनादरम्यान दादर येथे झालेल्या निदर्शनावेळी पोलीस व्हॅन अडवल्याच्या घटनेमुळे चर्चेत आलेल्या मॉडेल रिया अहिर यांनी आज, सोमवारी अंधेरीतील MIDC पोलीस ठाण्यात धाव घेतली. सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात करण्यात येत असलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पण्या, वैयक्तिक छायाचित्रांचा गैरवापर करून पसरवला जाणारा मजकूर तसेच मिळत असलेल्या धमक्यांबाबत त्यांनी तक्रार दाखल केली. रिया अहीर यांनी सांगितले की, यापूर्वीच […]

Mumbai Protest Girl Riya Ahir : आंदोलनातील व्हायरल चेहरा, मॉडेल रिया अहिरची पोलिसांत धाव; सोशल मीडियावरील धमक्या आणि आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केली तक्रार

मुंबई : NEET आंदोलनादरम्यान दादर येथे झालेल्या निदर्शनावेळी पोलीस व्हॅन अडवल्याच्या घटनेमुळे चर्चेत आलेल्या मॉडेल रिया अहिर यांनी आज, सोमवारी अंधेरीतील MIDC पोलीस ठाण्यात धाव घेतली. सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात करण्यात येत असलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पण्या, वैयक्तिक छायाचित्रांचा गैरवापर करून पसरवला जाणारा मजकूर तसेच मिळत असलेल्या धमक्यांबाबत त्यांनी तक्रार दाखल केली. रिया अहीर यांनी सांगितले की, यापूर्वीच त्यांनी सायबर सेलच्या ऑनलाइन पोर्टलवर तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्या आज MIDC पोलीस ठाण्यात आल्या.

हेही वाचा : Mumbai Student Protest : आता मुंबईत विद्यार्थ्यांचा एल्गार! क्रांती दिनाला भव्य रॅलीचे आयोजन; 9 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना एकत्र येणाचे आवाहन

विद्यार्थ्यांवर होत असलेल्या कथित अन्यायाविरोधात आपण आवाज उठवला असून कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे रिया यांनी स्पष्ट केले. काही जण आपल्याला घाबरवण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सोशल मीडियावरील कोणतीही माहिती पडताळणी न करता खरी मानू नये, असे आवाहन रिया यांनी नागरिकांना केले. टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र धमक्या देणे, आक्षेपार्ह मजकूर पसरवणे आणि महिलांची बदनामी करणे स्वीकारार्ह नसल्याचे त्या म्हणाल्या. या प्रकरणात आपण कायदेशीर लढा सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number