मुंबईतील दुर्घटनाग्रस्तांना मदत जाहीर

मुंबई : मुंबईमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासूच मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. यामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणवार पाणी साचलं होतं. पावसामुळे मुंबईच्या चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून २ लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली. Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of […]

मुंबईतील दुर्घटनाग्रस्तांना मदत जाहीर

मुंबई : मुंबईमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासूच मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. यामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणवार पाणी साचलं होतं. पावसामुळे मुंबईच्या चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून २ लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली.

पावसामुळे मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागामध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला. केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमी व्यक्तींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना मोफत उपचार देण्याची घोषणा राज्याने केली. राज्य आणि केंद्र सरकारने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मदत जाहीर केली आहे.

मुंबईच्या चेंबूरमधील आरसीएफ परिसरातल्या भारत नगरमध्ये मध्यरात्री अतिपावसामुळे डोंगर पायथ्याशी बांधलेल्या भिंतीवर दरड कोसळली. त्यामुळे ही भिंत लागूनच असलेल्या घरांवर कोसळली आणि मोठी दुर्घटना घडली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number