टिपू क्रिडांगण नामकरणावरून अमित साटमचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मालाड येथील क्रिडांगणाला टिपू सुलतान नाव देण्यात आले. त्यामुळे क्रिडांगणाच्या टिपू सुलतान नावाला हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपाने विरोध दर्शवित आंदोलन केले. टिपू क्रिडांगण बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला आहे. त्यामुळे अमित साटम यांनी क्रिडांगणाच्या टिपू सुलतान नावावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. तसेच मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्याची मागणी […]

टिपू क्रिडांगण नामकरणावरून अमित साटमचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मालाड येथील क्रिडांगणाला टिपू सुलतान नाव देण्यात आले. त्यामुळे क्रिडांगणाच्या टिपू सुलतान नावाला हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपाने विरोध दर्शवित आंदोलन केले. टिपू क्रिडांगण बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला आहे. त्यामुळे अमित साटम यांनी क्रिडांगणाच्या टिपू सुलतान नावावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. तसेच मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्याची मागणी अमित साटम यांनी केली आहे.

मुख्यमंत्री यांना पत्र लिहिताना माझी द्विधा मनस्तिती होत आहे. कारण तुम्हाला मुख्यमंत्री म्हणू की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून साद घालावी. यामुळेच समस्त हिंदूतर्फे दोन्ही पदाला साद घालण्याचे ठरवले. महापौर किशोरी पेडणेकर जाहीर करतात की, टिपू सुलतान क्रिडांगण नामकरणाचा फलक अवैध आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल. तसेच दुसऱ्या बाजूला बचाव करण्यासाठी खोटी बनावट दस्ताऐवज वापत आहेत. वास्तविक जर टिपू सुलतान नामफलक अवैध असेलतर महापौरांनी ते उतरवले पाहिजे होते. परंतु असे न करता पालकमंत्र्यांच्या बचाव कार्यातच्या मग्न आहेत, असे अमित साटम यांनी पत्रात नमूद केले आहे.

टिपू नामांतरणाच्या वादात मनसेची उडी

मनसेचे नेते संतोष धुरी यांनी ट्विट करत टिपू नामांतरणावर निशाणा साधला आहे. पेंग्विनचे नामकरण केले. आता पक्षाचे पण नामकरण टीपुसेना करा. विचार तर बदलेले आहेतच, आता भगव्या झेंड्या ऐवजी हिरवा झेंडा हातात घ्या, असे ट्विट करत सामान्यांची भावना संतोष धुरी यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number