Latur Crime Updates : लातूर विनयभंग प्रकरणात पोलिसांची नाचक्की, गुन्हा दाखल करण्यासाठी लाच मागणारे पोलीस फरार

लातूरमध्ये पत्नीवरील अत्याचाराची तक्रार नोंदवण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप समोर आला असून संबंधित प्रकरणात पोलिसांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Latur Crime Updates : लातूर विनयभंग प्रकरणात पोलिसांची नाचक्की, गुन्हा दाखल करण्यासाठी लाच मागणारे पोलीस फरार

लातूर : पत्नीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी जळकोट पोलिसांनी 25 हजार रुपयाची लाच मागून धमकी दिल्याचे सांगून 2 पोलीस कर्मचाऱ्यांसह 6 आरोपींची नावे हातावर लिहून जळकोट तालुक्यातील मौजे एकुर्गा खुर्द येथील दत्तात्रय जायभाये नावाच्या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर जळकोट पोलीस ठाण्याचा पोलीस कर्मचारी माणिक कसबे, वाढवणा पोलीस ठाण्याचा कर्मचारी शिवाजी केंद्रे याच्यासह 6 सहा आरोपींवर जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु गुन्हा दाखल होताच 2 दोन पोलिसांसह सर्वच आरोपी फरार झाल्याने लातूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. 

पत्नीचा विनयभंग झाला म्हणून तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी 25 हजाराची लाच मागितली. दुसरीकडे आरोपी आणि पोलीस दोघेही शेतकऱ्याला धमकी देत असल्याने नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्याने हातावर सुसाईड नोट लिहून विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर तपासात दोन पोलीस आणि चार आरोपी सहभागी असल्याची बाब तपासात उघड झाली. दरम्यान या प्रकरणात आरोपी असलेला जळकोट पोलीस ठाण्याचा कर्मचारी माणिक कसबे, वाढवणा पोलीस ठाण्याचा कर्मचारी शिवाजी केंद्रे हे दोन पोलीस व तुळशीदास केंद्रे, गणेश केंद्रे, तुळशीदास यांचा जावई व मेहुना असे पुण्यातील सर्वच सहा आरोपी फरार झाले आहेत.

सुरुवातीला तपासाला मदत करणारे आरोपी 2 पोलीस कर्मचारी अन्य 4 आरोपींसह अचानक फरार झाल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले असून फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आले आहेत. तर पुण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अहमदपूरचे पोलीस उपाधीक्षक तथा तपास अधिकारी अरविंद रायबोळे यांनी ‘जय महाराष्ट्र’शी दूरध्वनी वरून बोलताना दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number