कोल्हापूरात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पत्नी गंभीर जखमी असून पतीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मात्र या स्फोटात सहा महिन्याचे बाळ बचावले असल्याची माहिती समोर आली आहे. समिना शेख असे पत्नीचे नाव असून नदीम शेख यांचा जागीच मृत्यू झाला आहे. नेमकं काय घडलं ? कोल्हापूरच्या इचलकरंजीतील शहापूर येथील […]

कोल्हापूरात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पत्नी गंभीर जखमी असून पतीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मात्र या स्फोटात सहा महिन्याचे बाळ बचावले असल्याची माहिती समोर आली आहे. समिना शेख असे पत्नीचे नाव असून नदीम शेख यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं ?

कोल्हापूरच्या इचलकरंजीतील शहापूर येथील आंबेडकर चौकात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला.

सिलेंडरच्या स्फोटामुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे.

सिलेंडर पेटवत असताना हा स्फोट झाल्याचे समजते आहे.

नदीम शेख असे मृत पतीचे नाव असून समिना शेख गंभीर जखमी झाल्या आहेत.

शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

मात्र सहा महिन्याचे बाळ बचावले आहे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number