कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला रामराम

काँग्रेसमधील नाराज नेत्यांच्या जी २३ गटातील प्रमुख नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. मागील अनेक दिवसांपासून कपिल सिब्बल पक्षावर नाराज होते. सिब्बल यांनी १६ मे रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मागील काही दिवसांपासून कपिल सिब्बल यांनी काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधत आहेत. तर नुकताच पार […]

कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला रामराम

काँग्रेसमधील नाराज नेत्यांच्या जी २३ गटातील प्रमुख नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. मागील अनेक दिवसांपासून कपिल सिब्बल पक्षावर नाराज होते. सिब्बल यांनी १६ मे रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मागील काही दिवसांपासून कपिल सिब्बल यांनी काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधत आहेत. तर नुकताच पार पडलेल्या चिंतन शिबिरातही सिब्बल यांनी गैरहजेरी दर्शवली. त्यानंतर १६ मे रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्याबाबत काहीही उघड केले नव्हते.

अखेर आज सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याचे उघड केले आहे. त्यांनी १६ मे रोजीच राजीनाम दिल्याचे सांगितले आहे. दरम्यान, कपिल सिब्बल यांनी समाजवादी पार्टीच्या पाठिंब्यावर राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. यावेळी त्यांच्यासोबत सपाचे प्रमुख अखिलेश यादव हेदेखील उपस्थित होते. सपाकडील आमदारांचे संख्याबळ पाहता, कपिल सिब्बल राज्यसभेत निवडून जाणं निश्चित आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number