Kamala Pasand Family Tragedy : पतीच्या दुसऱ्या पत्नीचा मुद्दा की आणखी काही?; ‘या’ बड्या बँडच्या उद्योजकाच्या सुनेचा मृत्यू बनलं गूढ

मिळालेल्या माहितीनुसार, हरप्रीत यांनी दोन विवाह केले असून त्यांची दुसरी पत्नी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री असल्याचे सांगितले जाते.

Kamala Pasand Family Tragedy : पतीच्या दुसऱ्या पत्नीचा मुद्दा की आणखी काही?; ‘या’ बड्या बँडच्या उद्योजकाच्या सुनेचा मृत्यू बनलं गूढ

नवी दिल्ली: कमला पसंद आणि राजश्री पान मसाला समूहाशी संबंधित कुटुंबात मोठी दुर्घटना घडली आहे. या समूहाचे मालक कमल किशोर यांची सुन दीप्ती चौरसिया (वय 40) यांनी मंगळवारी संध्याकाळी आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट मिळाल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र त्यात कोणावरही आरोप करण्यात आलेला नाही. तरीही, दीप्ती यांच्या कुटुंबीयांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार पोलिसांकडे दिली आहे. दीप्ती चौरसिया यांचा विवाह 2010 मध्ये कमल किशोर यांचा मुलगा हरप्रीत चौरसिया यांच्याशी झाला होता. त्यांना 14 वर्षांचा मुलगा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरप्रीत यांनी दोन विवाह केले असून त्यांची दुसरी पत्नी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री असल्याचे सांगितले जाते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वसंत विहार पोलिसांकडून सुरू आहे. माहितीनुसार, दीप्ती यांचा मृतदेह घरात ओढणीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळला. मिळालेल्या माहितीनुसार सुसाईड नोट सापडली असली, तरी त्यात कोणाचे नाव आहे, काय मजकूर आहे, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. कमला पसंद समूहाचा व्यवसाय कानपूर, दिल्ली, कोलकाता आणि मुंबईसह अनेक शहरांत पसरलेला आहे. या उद्योगाची सुरुवात कानपूरमध्ये झाली होती.

हेही वाचा: Raj Thackeray: 'मुंबई' नावावरून राज ठाकरे यांचा केंद्रावर प्रहार; म्हणाले "मराठी माणसा…."

कमलाकांत चौरसिया यांनी सुमारे 40 ते 45 वर्षांपूर्वी एका लहान खोलीमधून पान मसाला विक्री सुरू केली होती. नंतर कुटुंबाच्या मदतीने त्यांनी उत्पादन आणि वितरणाचा विस्तार केला आणि आज हा व्यवसाय अब्जावधी रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोहोचला आहे. कमला पसंद पान मसाल्याचा मालकी हक्क केपी समूह आणि कमला कांत कंपनी यांच्या नावावर आहे.

या ब्रँडचे संस्थापक कमला कांत चौरसिया आणि कमल किशोर चौरसिया असल्याचे सांगितले जाते. तसेच मानिकचंद समूहाकडून कमला पसंद माउथ फ्रेशनर नावाने संबंधित उत्पादन तयार केल्याची माहिती आहे. परंतु मुख्य पान मसाला ब्रँड केपी समूहाशी संलग्न आहे. कमला कांत कंपनी एलएलपीकडे या ब्रँडचा ट्रेडमार्क हक्क आहे. दीप्ती चौरसिया यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि त्यामागील परिस्थितीचा संपूर्ण तपास अद्याप सुरू आहे.

हेही वाचा: Mumbai Crime: कुर्ल्यात धक्कादायक कृत्य! वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान मित्रांनी केला तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number