Crime News: ऐकावं ते नवलच! शुल्लक कारणावरून जावयाने थेट सासरवाडीवर चालवला बुलडोझर ; आधी भिंत पाडली आणि मग…

या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.

Crime News: ऐकावं ते नवलच! शुल्लक कारणावरून जावयाने थेट सासरवाडीवर चालवला बुलडोझर ; आधी भिंत पाडली आणि मग…

झारखंड: भारतीय संस्कृतीत जावयाला मानाची व्यक्ति मानली जाते आणि सासरी त्याचा मोठा मानसन्मान होतो. मात्र, झारखंडमध्ये एका जावयाने आपल्या सासरच्या लोकांचा जो काही पाहुणचार केला, तो पाहून संपूर्ण राज्य हादरले आहे. पत्नी वारंवार माहेरी जाते आणि सासरी परत येत नाही, या रागातून एका संतापलेल्या जावयाने चक्क बुलडोझर (JCB) भाड्याने घेतला आणि थेट सासरवाडीवर 'सर्जिकल स्ट्राईक' केला. या विचित्र प्रकारामुळे परिसरात सध्या संतापासोबतच आश्चर्याची लाट पसरली आहे.

ही थरारक घटना गिरीडीह जिल्ह्यातील जमुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पिंटू मंडल नावाचा हा तरुण दारूच्या व्यसनामुळे आपल्या संसाराची राखरांगोळी करत होता. दारूच्या नशेत तो पत्नी उर्मिलाला सतत मारहाण करत असे.

पतीच्या या अमानुष जाचाला कंटाळून अखेर उर्मिलाने आपल्या दोन लहान मुलांसह माहेरचा रस्ता धरला. पत्नीने घर सोडल्याचा राग पिंटूच्या मनात असा काही भरला की, त्याने सासरच्या लोकांचा सूड घेण्याचे ठरवले. त्याने डोके चालवले पण ते विनाशासाठी. त्याने एक जेसीबी मशीन भाड्याने घेतले आणि वाजतगाजत नव्हे, तर 'हल्लाबोल' करत सासरवाडी गाठली.

हेही वाचा: Gautam Gambhir: गौतम गंभीरचे टेन्शन वाढले; कसोटी प्रशिक्षकपदासाठी BCCI कडून 'या' दिग्गजाला ऑफर, पाहा कोणाची लागणार वर्णी?

जेव्हा पिंटू जेसीबी घेऊन सासरवाडीत पोहोचला, तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की तो नक्की काय करणार आहे. पण काही क्षणातच त्याने जेसीबीचा पंजा फिरवला आणि सासरच्या घराची कंपाउंड भिंत जमीनदोस्त केली. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने मुख्य घराचेही नुकसान करण्याचा प्रयत्न केला.

जेसीबीचा प्रचंड आवाज आणि घराची पडझड पाहून गावात एकच गोंधळ उडाली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेताच, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून या 'बुलडोझर जावया'ने यंत्रासह तिथून पळ काढला.

सध्या या प्रकरणाची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. पिंटूच्या सासऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा कट पिंटूने त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीने रचला होता. उत्तर प्रदेशात गुन्हेगारांवर बुलडोझर चालवला जातो, पण इथे जावयानेच सासरवाडीवर बुलडोझर चालवल्याने ही बातमी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोलीस आता या 'बाहुबली' जावयाचा शोध घेत असून, या विचित्र गुन्ह्यासाठी त्याला काय शिक्षा मिळते, हे पाहणे महत्वाचे ठरेल. 

हेही वाचा: Delhi Air Pollution: अक्षरधाम गायब, रस्ते धूसर; दिल्लीत स्मॉगचा हाहाकार, दाट धुक्यात हरवली देशाची राजधानी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number