Udaipur Crime : वाढदिवसाच्या पार्टीत CEO च्या गाडीत IT मॅनेजर महिलेवर सामूहिक अत्याचार; संपूर्ण घटना डॅशकॅमवर कैद

एका खाजगी आयटी (IT) कंपनीच्या महिला मॅनेजरवर कंपनीच्या सीईओने आणि एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या पतीने चालत्या गाडीत सामूहिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

Udaipur Crime : वाढदिवसाच्या पार्टीत CEO च्या गाडीत IT मॅनेजर महिलेवर सामूहिक अत्याचार; संपूर्ण घटना डॅशकॅमवर कैद

Udaipur Crime : राजस्थानमधील उदयपूर शहरातून एक अतिशय संतापजनक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका खाजगी आयटी (IT) कंपनीच्या महिला मॅनेजरवर कंपनीच्या सीईओने आणि एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या पतीने चालत्या गाडीत सामूहिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या कारमध्ये हे नराधम कृत्य घडले, त्या गाडीच्या डॅशकॅममध्ये (Dashcam) या घटनेचे ऑडिओ आणि व्हिडिओ फुटेज रेकॉर्ड झाले आहे.

वाढदिवसाच्या पार्टीत रचला कट

ही घटना 20 डिसेंबर रोजी घडली. कंपनीच्या सीईओच्या वाढदिवसाचे आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुखेर परिसरातील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आले होते. रात्री 9 वाजता सुरू झालेली ही पार्टी दीड वाजेपर्यंत चालली. पीडितेच्या आरोपानुसार, पार्टीमध्ये मद्यपानानंतर तिची प्रकृती बिघडली आणि ती अर्धवट बेशुद्ध अवस्थेत होती. तिच्या याच असहाय्यतेचा फायदा आरोपींनी घेतला.

हेही वाचा – Nanded Crime : काळजाचा थरकाप उडवणारी घटना; पोटच्या पोरांनी रेल्वेखाली जीव दिला, विरहाने आई-बापानेही संपवली जीवनयात्रा

घरी सोडण्याच्या बहाण्याने अत्याचार

पार्टी संपल्यानंतर इतर पाहुणे निघून गेले. त्यानंतर कंपनीचे सीईओ, एक महिला कार्यकारी प्रमुख आणि तिचा पती यांनी पीडितेला घरी सोडण्याचा प्रस्ताव दिला. त्यांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. वाटेत तिला काही अमली पदार्थ सेवन करण्यास भाग पाडले, ज्यामुळे ती पूर्णपणे बेशुद्ध पडली. जेव्हा तिला शुद्ध आली, तेव्हा तिला आपल्यावर अत्याचार झाल्याचे लक्षात आले.

डॅशकॅममुळे झाला मोठा उलगडा 

पीडितेने सुरुवातीला घाबरून ही घटना कोणाला सांगितली नाही. मात्र, त्यानंतर तिने कारमधील डॅशकॅमचे फुटेज तपासले असता, त्यामध्ये आरोपींचे भयानक कृत्य आणि संवाद रेकॉर्ड झाल्याचे दिसून आले. या भक्कम पुराव्याच्या आधारे तिने 23 डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

हेही वाचा – Saksham Tate Case: न्यायासाठी अग्निपरीक्षा ! सक्षम ताटेच्या प्रेयसीसह आईचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिसांची कारवाई आणि तपास

उदयपूरचे पोलीस अधीक्षक योगेश गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एका महिलेसह तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. महिला गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी वर्मा या प्रकरणाचा तपास करत आहेत. पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून पोलीस आता फॉरेन्सिक अहवालाची वाट पाहत आहेत. या घटनेमुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला असून संपूर्ण राजस्थानमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number