कोल्हापुरमध्ये मानसिंग बोंद्रेचा अंदाधुंद गोळीबार

कोल्हापुरातील दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि मालमत्तेच्या वादातून मानसिंग विजय बोंद्रे यांनी राहत्या घराच्या कंपाऊंडजवळ अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी मानसिंग बोंद्रे यांच्या विरोध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. मानसिंग बोंद्रे यांचे सावत्र भाऊ अभिषेक चंद्रकांत उर्फ सुभाष बोंद्रे यांनी फिर्याद दाखल […]

कोल्हापुरमध्ये मानसिंग बोंद्रेचा अंदाधुंद गोळीबार

कोल्हापुरातील दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि मालमत्तेच्या वादातून मानसिंग विजय बोंद्रे यांनी राहत्या घराच्या कंपाऊंडजवळ अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे.

या प्रकरणी मानसिंग बोंद्रे यांच्या विरोध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. मानसिंग बोंद्रे यांचे सावत्र भाऊ अभिषेक चंद्रकांत उर्फ सुभाष बोंद्रे यांनी फिर्याद दाखल केली आहे. मानसिंग बोंद्रे यांनी, अभिषेक बोंद्रे यांना आणि त्यांच्या खानदानाला संपवित तुझा गेम करतो अशी धमकी संशयितांनी दिल्याचे अभिषेक बोंद्रे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडताच घटनास्थळी पोलीस हजर झाले. तसेच मानसिंग बोंद्रे यांन गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे मानसिंग बोंद्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number