946 कोटी आर्थिक घोटाळ्याच्या आरोपात बँकेचे संस्थापक राणा कपूर यांचा जामीन मंजूर

येस बँकचे संस्थापक असलेल्या राणा कपूर यांच्यावर 946 कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप होता. मात्र, सीबीआयला कोणताही ठोस पुरावा न मिळाल्यामुळे त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला.

946 कोटी आर्थिक घोटाळ्याच्या आरोपात बँकेचे संस्थापक राणा कपूर यांचा जामीन मंजूर

मुंबई: गेल्या काही वर्षांपासून नवनवीन घोटाळ्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. अशातच, येस बँक लोन घोटाळा प्रकरणात संस्थापक राणा कपूर यांचा जामीन मंजूर झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. येस बँकचे संस्थापक असलेल्या राणा कपूर यांच्यावर 946 कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप होता. मात्र, या प्रकरणात सीबीआयला कोणताही ठोस पुरावा न मिळाल्यामुळे येस बँकचे संस्थापक राणा कपूर यांचा जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

येस बँकच्या संस्थापकाविरोधात आरोपपत्र

येस बँकचे संस्थापक राणा कपूर यांच्यावर 946 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. ज्यामुळे त्यांच्याविरोधात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले होते. या आरोपपत्रामध्ये येस बँकमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली होती. या घटनेनंतर, येस बँकचे संस्थापक राणा कपूर यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये सीबीआयला कोणताही ठोस पुरावा न मिळाल्यामुळे येस बँकचे संस्थापक राणा कपूर यांचा जामीन मंजूर केला गेला.

4300 कोटींच्या मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली राणा ताब्यात

भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती, येस बँकचे संस्थापक राणा कपूर यांच्यावर 4 हजार 300 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचे आरोप असल्यामुळे ईडीने त्यांना ताब्यात देखील घेतले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number