‘रायगडाच्या विद्रुपीकरणाची हिम्मत होतेच  कशी?’ – संभाजीराजे भोसले

रायगडावर दगडांना पांढरा रंग फासत केलेले बांधकाम आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रायगडावर पांढरी भिंत बांधून नमाज पठण करण्यात आले. याविरोधात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा वाद उफाळल्यावर रायगड संवर्धनाची जबाबदारी असलेल्या राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी पुरातत्व विभागाला जागे करणारे पत्र लिहिले. हे पत्र समोर आल्यानंतर कारवाई झाल्याचा दावा संभाजीराजे यांनी केला. संभाजीराजे भोसले […]

‘रायगडाच्या विद्रुपीकरणाची हिम्मत होतेच  कशी?’ – संभाजीराजे भोसले

रायगडावर दगडांना पांढरा रंग फासत केलेले बांधकाम आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रायगडावर पांढरी भिंत बांधून नमाज पठण करण्यात आले. याविरोधात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा वाद उफाळल्यावर रायगड संवर्धनाची जबाबदारी असलेल्या राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी पुरातत्व विभागाला जागे करणारे पत्र लिहिले. हे पत्र समोर आल्यानंतर कारवाई झाल्याचा दावा संभाजीराजे यांनी केला.

संभाजीराजे भोसले यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘दुर्गराज रायगडवरील मदार मोर्चा येथील प्रकाराची दखल घेत आज सकाळीच पुरातत्त्व विभागास पत्र लिहून केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या महासंचालिका विद्यावती जी आणि मुंबई विभागाचे अधीक्षक पुरात्वशास्त्रज्ञ राजेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधून तात्काळ याविषयी योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. यास प्रतिसाद देत पुरातत्त्व विभागाने मदार मोर्चा येथील रंगरंगोटी हटवून ते ठिकाण पूर्ववत केलेले आहे. तसेच त्याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आलेली आहे.’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number