राज्यात गुरुवारी होळीचा सण

राज्यात आज होळीचा सण विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मध्यरात्री वरळी कोळीवाड्यात होळीनिमित्त कोळी बांधव आणि भगिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत मोठ्या संख्येने स्थानिकांची आणि कोळी बांधावांनि उपस्थिती लावली. तर वर्सोवा कोळीवाड्यातही हा सण उत्साहात साजरा केला जातो. घोडबंदर गावातही होळीच्या आदल्या रात्री छोटी होळीचे दहन केले जाते. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजनही […]

राज्यात गुरुवारी होळीचा सण

राज्यात आज होळीचा सण विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मध्यरात्री वरळी कोळीवाड्यात होळीनिमित्त कोळी बांधव आणि भगिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत मोठ्या संख्येने स्थानिकांची आणि कोळी बांधावांनि उपस्थिती लावली. तर वर्सोवा कोळीवाड्यातही हा सण उत्साहात साजरा केला जातो. घोडबंदर गावातही होळीच्या आदल्या रात्री छोटी होळीचे दहन केले जाते. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते.

होळीतील पेटती लाकड फेकण्याची अनोखी परंपरा

होळी हा कोकणातील मुख्यसणांपैकी एक पारंपारीक सण आहे. या पारंपारीक सणांमध्ये अनोख्या परंपरा साजऱ्या केल्या जातात. अशा पैकी एक म्हणजे देव आणि दानवांचे युद्ध. रायगड जिल्ह्यातील महाड शहरात होळीदरम्यान देव आणि दानवांचे युद्ध होते. या युद्धाच्या वेळी होळीतील जळकी लाकड, निखारे फेकले जातात. देव दानवाचे युद्ध, पेटती लाकडे फेकण्याचा थरार पहायला येथे असंख्य नागरीक येतात.

होळीत केमिकलयुक्त रंग टाळा

होळी सणात रसायनयुक्त रंग वापरल्यामुळे काय दुष्परिणाम होतात, याचा देखावा गोंदियातीलर रांगोळी चित्रकाराने रांगोळीच्या माध्यमातून  दाखवला आहे. रांगोळी चित्रकार सोनी भाना फुलसुंगे या तरुणीने रांगोळीच्या माध्यमातून संदेश दिला आहे.

होळी सणामध्ये रंगाची उधळ आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. मात्र, याचे मानवी जीवनावर अनेक दुष्परिणाम होतात. हेच दुष्परिणाम या रांगोळीच्या माध्यमातून चित्रकाराने दाखविले आहे. गोंदियातील रांगोळी चित्रकार सोनी भावना फूलसुगे या तरुणीने सेव नेचर, सेव ट्री, सेव पीपल ही रांगोळी साकारली असून यात तीन तरुणांनानी केमिकल युक्त रंगाचा वापर केला आहे.

मेळघाटात होळीची तयारी

अमरावती जिल्ह्यातील आदिवासीबहुल मेळघाट भागातील आदिवासी बांधव आपल्या उदरनिर्वाहासाठी राज्यभर विविध ठिकाणी काम करण्यासाठी जातात. आदिवासी समाजातील मुख्य सण असलेल्या होळीनिमित्त आदिवासी बांधव आता मेळघाटात परतू लागले आहेत. होळी निमित्ताने गावात आल्याचा आनंद सादर करत मेळघाटातील अनेक गावांच्या रस्तावर कशाप्रकारे नृत्य करताना दिसत आहे..

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number