पुण्यात पावसाचे 11 बळी, जनजीवन विस्कळीत

पुणे शहरात सलग तीन दिवस पाऊस सुरू आहे. तर काल पुण्यात चार तासात पावसाने अक्षरशः रौद्ररूप धारण केले होते. या संपूर्ण घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आत्तापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला तर अजूनही चार जण बेपत्ता आहेत. तर अनेक वाहने वाहून गेली आहेत. तर काही वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे.या संपूर्ण पावसाचा फटका जनावरांना […]

पुण्यात पावसाचे 11 बळी, जनजीवन विस्कळीत

पुणे शहरात सलग तीन दिवस पाऊस सुरू आहे. तर काल पुण्यात चार तासात पावसाने अक्षरशः रौद्ररूप धारण केले होते. या संपूर्ण घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आत्तापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला तर अजूनही चार जण बेपत्ता आहेत. तर अनेक वाहने वाहून गेली आहेत. तर काही वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे.या संपूर्ण पावसाचा फटका जनावरांना देखील बसला आहे.

या पावसामुळे जनावरे वाहून गेली आहेत तर यात जनावरांचा मृत्यूही झाला आहे. याचा सर्वाधिक फटका हा सहकारनगर,बिबवेवाडी,दांडेकर पूल येथील वस्ती, सोसायटीना बसला आहे. या सोसायटीमध्ये दहा ते पंधरा फूट पाणी शिरले होते. यातच टांगेवाला कॉलनी येथे भिंत पडून सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या संपूर्ण दुर्घटनेत नागरिकांच्या घराचं मोठं नुकसान झालं आहे. अनेकांचे संसार उधवस्त झाले आहेत. सहकार नगर येथील आंबील ओढा अरुंद केल्याने अशी परिस्थिती उदभवली असा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली सारखी परिस्थिती काल रात्री पुणेकरांनी अनुभवली.

प्रशासनाने सर्वत्र साफसफाई सुरु केली असून अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शर्थीने ही परिस्थीती हाताळली. या संपूर्ण घटनेमुळे पुण्यातील नाले, नदीपात्र यावर झालेल्या अतिक्रमणाचा मुदा पुन्हा उपस्थीत झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number