हेडफोन बेतले जीवावर

कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडणं तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. रेल्वेचा आवाज ऐकू न आल्याने रेल्वेचा धक्का लागून या तरुणीचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. स्नेहल उजेनकर असं या तरुणीचं नाव असून ती २० वर्षांची होती. स्नेहल उजेनकर जळगाव शहरातील काळे नगर भागात राहत होती. ती एका खासगी दुकानात […]

हेडफोन बेतले जीवावर

कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडणं तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. रेल्वेचा आवाज ऐकू न आल्याने रेल्वेचा धक्का लागून या तरुणीचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. स्नेहल उजेनकर असं या तरुणीचं नाव असून ती २० वर्षांची होती. स्नेहल उजेनकर जळगाव शहरातील काळे नगर भागात राहत होती. ती एका खासगी दुकानात कामाला होती.

काम आटोपून घरी जात असताना ती नेहमीच कानात हेडफोन घालून घराकडे जात असे. घराकडे जात असताना शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या जवळ रेल्वे रुळ ओलांडताना त्या ठिकाणी असलेला अंधार आणि कानात असलेल्या हेडफोनमुळे तिला समोरुन येणाऱ्या रेल्वेचा आवाज आला नाही. रेल्वे रुळ ओलांडत असताना सुरत-भुसावळ पॅसेंजरची तिला जोरदार धडक बसून ती फेकली गेल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. मृत्यु नंतर हेडफोन तिच्या कानात आढळून आल्याने रूळ ओलांडत असताना तिला रेल्वेचा आवाज आला नसल्याचा पोलिसांना प्राथमिक अंदाज वर्तवला आहे

दरम्यान, स्नेहल उजेनकर या तरुणीचा काही महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. परंतु तिचा रेल्वेच्या धडकेत अपघाती मृत्यू झाल्याने मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटने संदर्भात मयत स्नेहल उजेनकरच्या परिवारकडून माहिती घेतली असता तिच्या आईने म्हटलं की, स्नेहल ही रोज सकाळी नऊ वाजता घरातून कामावर जायची आणि रात्री आठच्या सुमारास घरी यायची. गेल्या काही महिन्यांपासून तिचे नवऱ्यासोबत वाद होत होते. मंगळवारी २४ मे रोजी जेव्हा ही घटना घडली त्यावेळी ती तिच्या नवऱ्यासोबतच बोलत होती. त्यांच्यामधील वादात आलेल्या मानसिक तणावात तिला रेल्वे आल्याचं लक्षात आलं नसावं. ती नेहमी हेडफोन वापरत असली तरी ती एकाच कानात वापरत होती. त्यामुळे हेडफोनमुळे घटना झाल्यापेक्षा पतीच्या वादात आलेल्या तणावात हे घडलं असल्याचा अंदाज आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number