Female Constable Ends Her Life: ‘मी सैतान असते तर बरं झालं असतं..’ सोशल मीडिया पोस्ट लिहून महिला पोलिसाचं टोकाचं पाऊल

या महिला कॉन्स्टेबलने मृत्यूपूर्वी एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली होती. या पोस्टमागील नेमका संदर्भ काय होता आणि ती कोणाला उद्देशून लिहिली होती, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

Female Constable Ends Her Life: ‘मी सैतान असते तर बरं झालं असतं..’ सोशल मीडिया पोस्ट लिहून महिला पोलिसाचं टोकाचं पाऊल

Female Constable Ends Her Life: गांधीनगरमधील सेक्टर 3 D भागातील एका भाड्याच्या घरात महिला पोलिसाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सोमवारी आढळून आला. जान्हवी दाभी असे या 28 वर्षीय महिला कॉन्स्टेबलचे नाव असून ती मूळची अहमदाबादची रहिवाशी होती. गेल्या 5 वर्षांपासून ती पोलीस दलात सेवा बजावत होती. घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याची माहिती घर मालकाने दिल्यानंतर सेक्टर 7 पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती.

इन्स्टाग्रामवरील ती एक पोस्ट आणि संशयाचे जाळे
आत्महत्येच्या सुमारे 2 दिवस आधी जान्हवीने इन्स्टाग्रामवर एक भावूक आणि रहस्यमय संदेश पोस्ट केला होता. 'I wish I Was Monster you think I am' म्हणजेच "मी सैतान असते तर बरं झालं असतं, कारण तुला तसंच वाटतं" असा या पोस्टचा अर्थ होतो. या पोस्टमागील नेमका संदर्भ काय होता आणि ती कोणाला उद्देशून लिहिली होती, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. सोशल मीडियावरील पोस्टचा आत्महत्येशी थेट संबंध आहे का, याची सखोल तपासणी केली जात आहे.

हेही वाचा – Woman Biker Hit and Run: महिला रायडर 'हिट अँड रन'प्रकरणी पोलिसांची कारवाई; मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

कौटुंबिक पार्श्वभूमी आणि वैयक्तिक आयुष्य
जान्हवीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार ती स्वतःच्या अटींवर जगणारी महिला होती. तिच्या पहिल्या पतीच्या निधनानंतर तिने त्याच्या मोठ्या भावाशी विवाह केला होता. मात्र, काही काळातच त्यांच्यात वाद निर्माण झाले आणि सुमारे 1.5 वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. या कौटुंबिक घडामोडींनंतर ती गांधीनगरमध्ये एकटीच भाड्याच्या घरात राहत होती. या सर्व पार्श्वभूमीमुळे वैयक्तिक मतभेद, आर्थिक अडचणी किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे हे पाऊल उचलले गेले का, याचा शोध सुरू आहे.

तपासाची दिशा आणि डिजिटल पुरावे
याप्रकरणी पोलिसांनी जान्हवीचा मोबाईल फोन जप्त केला असून तिचे कॉल डिटेल्स आणि सोशल मीडिया अकाऊंट्स तपासले जात आहेत. तिच्या खोलीत कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे पोलीस आता डिजिटल पुराव्यांच्या आधारे घटनेचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहेत. तिच्यावर काही आर्थिक किंवा वैयक्तिक तणाव होता का, या बाबींचीही कसून चौकशी सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूची नेमकी वेळ स्पष्ट होईल.

हेही वाचा – Sanjeev Sonawane Death: शेजाऱ्यांकडून कुलूप उघडून घरात प्रवेश केला अन्… बहिणीच्या डोळ्यांसमोर दिसलं भयंकर दृश्य

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number