Gold Silver Rates: सोने-चांदीची ऐतिहासिक झेप! दरांनी मोडले विक्रम; गुंतवणूकदार खूश, खरेदीदार चिंतेत

आंतरराष्ट्रीय बाजारासह एमसीएक्सवरही चांदीने आक्रमक उसळी घेतली, तर सोन्याचे दर विक्रमी पातळीच्या जवळ स्थिरावले. या तेजीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

Gold Silver Rates: सोने-चांदीची ऐतिहासिक झेप! दरांनी मोडले विक्रम; गुंतवणूकदार खूश, खरेदीदार चिंतेत

मुंबई: सराफा बाजारात यंदा सोने-चांदीने अक्षरशः नवे विक्रम प्रस्थापित केले असून, आता या तेजीत आणखी भर पडताना दिसत आहे. अमेरिकेतून समोर आलेल्या कमकुवत रोजगार आकडेवारीमुळे जागतिक बाजारात व्याजदर कपातीच्या अपेक्षा बळावल्या आणि त्याचा थेट फायदा मौल्यवान धातूंना झाला. परिणामी, बुधवारी बाजार सुरू होताच गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हसू तर खरेदीदारांच्या कपाळावर आठ्या पडल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बुधवारी जागतिक बाजारात चांदीचा दर थेट प्रति औंस 65 डॉलरच्या पुढे गेला आणि नवा विक्रमी उच्चांक नोंदवला. स्पॉट मार्केटमध्येही चांदीने जोरदार उसळी घेत 2.8 टक्के वाढीसह 65.63 डॉलर प्रति औंसची पातळी गाठली. सोन्यानेही या तेजीला साथ दिली असून स्पॉट गोल्ड 0.4 टक्के वाढून प्रति औंस 4,321.56 डॉलरवर पोहोचले. या जागतिक घडामोडींचा परिणाम भारतीय वायदे बाजारावरही स्पष्टपणे दिसून आला.

हेही वाचा: Indian Stock Market: शेअर बाजारात चढउतार! निफ्टी 25900वर स्थिर, सेन्सेक्समध्ये मोठी हालचाल

बुधवार, 17 डिसेंबर रोजी एमसीएक्सवर सोन्याच्या दरात अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढ नोंदली गेली, तर चांदीच्या किमतींमध्ये तब्बल 4 टक्के उसळी पाहायला मिळाली. एमसीएक्सवरील सोन्याचा फेब्रुवारी करार 0.55 टक्के वाढून प्रति 10 ग्रॅम 1,35,150 रुपयांवर पोहोचला, जो मागील सत्रातील विक्रमी पातळीच्या अगदी जवळ होता. चांदीच्या बाबतीत तेजी अधिक आक्रमक ठरली. एमसीएक्सवरील मार्च फ्युचर्स 4 टक्के वाढून प्रति किलो 2,05,665 रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचले. मात्र, दिवसाअखेरीस डॉलरच्या मजबुतीमुळे काही प्रमाणात नफावसुली दिसून आली. डॉलर निर्देशांकात 0.20 टक्के वाढ झाल्याने सोन्याच्या दरावर दबाव आला आणि फेब्रुवारी वायदा किंमत घसरून 1,34,129 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत आली. त्याचवेळी चांदीचा दर 3.38 टक्के वाढीसह 2,04,445 रुपये प्रति किलोवर स्थिरावला.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील कामगार बाजारातील कमकुवतपणा आणि फेडरल रिझर्व्हकडून जानेवारीमध्ये पुन्हा एकदा व्याजदर कपातीची शक्यता या दोन्ही गोष्टी सोने-चांदीसाठी पोषक ठरत आहेत. कमी व्याजदर आणि डॉलरवरील दबावाच्या वातावरणात उत्पन्न न देणाऱ्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे गुंतवणूकदारांचा कल वाढतो आणि त्याचा थेट फायदा सोने-चांदीला होतो.

दरम्यान, गुंतवणूकदारांचे लक्ष आता अमेरिकेच्या आगामी महागाईविषयक आकडेवारीकडे लागले आहे. ही आकडेवारी पुढील दरवाढीच्या किंवा घसरणीच्या दिशेचा संकेत देऊ शकते. दुसरीकडे, रशिया-युक्रेन युद्धाच्या संभाव्य समाप्तीबाबत येणाऱ्या चर्चांमुळे सराफा बाजारातील गुंतवणुकीविषयी भावना काही प्रमाणात सावध बनल्या आहेत. एकूणच, सध्याची तेजी ही जागतिक आर्थिक अनिश्चितता, व्याजदर धोरण आणि चलनबाजारातील हालचाली यावर अवलंबून असून, “ही तेजी किती काळ टिकणार?” हा प्रश्न गुंतवणूकदार आणि खरेदीदार दोघांच्याही मनात कायम आहे.

हेही वाचा: BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर! कोणत्या प्रभागात सर्वाधिक आणि कमी मतदार?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number