कोकणातील रिफायनरीबाबत गडकरींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोकणातील रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, तसेच ज्या ठिकाणी विरोध नाही त्या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प होईल, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. दरम्यान, आता कोकणातील रिफायनरी प्रकल्प विदर्भात हलवा, याबाबतचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात लिहिले की, कोकणातला रिफायनरी प्रकल्प विदर्भात हलवा. तसेच या […]

कोकणातील रिफायनरीबाबत गडकरींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोकणातील रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, तसेच ज्या ठिकाणी विरोध नाही त्या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प होईल, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. दरम्यान, आता कोकणातील रिफायनरी प्रकल्प विदर्भात हलवा, याबाबतचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात लिहिले की, कोकणातला रिफायनरी प्रकल्प विदर्भात हलवा. तसेच या प्रकल्पासाठी लागणारी रस्ते, वाहतूक व इतर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

नितीन गडकरी यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंह पुरी यांनादेखील यासंदर्भात पत्र लिहिले होते. त्यानंतर आता  त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे आता नितीन गडकरींच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय उत्तर देतील, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number