मुखाग्नी दिला, अंत्यविधी झाला, इतक्यात समजलं; दोन मृतदेहाची झाली अदलाबदली, रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघडकीस, कुठे घडलं?

रस्ते अपघातात प्राण गमावलेल्या रुग्णाचा मृतदेह समजून कुटुंबीयांनी स्मशानभूमीत अंत्यविधी पूर्ण करण्यास सुरुवात केली होती.

मुखाग्नी दिला, अंत्यविधी झाला, इतक्यात समजलं; दोन मृतदेहाची झाली अदलाबदली, रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघडकीस, कुठे घडलं?

Wrong body handed over: दुःखाच्या वातावरणात अंत्यसंस्कार सुरू असतानाच रुग्णालयातून आलेला एक फोन अख्ख्या कुटुंबाला स्तब्ध करून गेला. बिहारमधील गया येथील नारायण मगध वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील प्रशासनाच्या अत्यंत निष्काळजी आणि बेजबाबदार कारभारामुळे एका कुटुंबाला भलत्याच अनोळखी व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली. रस्ते अपघातात प्राण गमावलेल्या रुग्णाचा मृतदेह समजून कुटुंबीयांनी स्मशानभूमीत अंत्यविधी पूर्ण करण्यास सुरुवात केली होती. चितेला मुखाग्नी देऊन मृतदेह जवळपास ७५ टक्के जळून खाक झाला असताना, पोलिसांचा फोन आला आणि प्रशासनाची भयानक चूक समोर आली. या प्रकारामुळे संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाबाहेर प्रचंड गोंधळ घातला.

रस्ते अपघातातील मृताची ओळख पटवण्यात गोंधळ 

गया जिल्ह्यातील गुरारू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्मा गावचे रहिवासी विगन दास यांचा शुक्रवारी गावाजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. शनिवारी सकाळी शवविच्छेदन प्रक्रियेनंतर रुग्णालयाने मृतदेह नातेवाइकांच्या हवाली केला. दुःखाच्या आवेगात कुटुंबीयांनी पार्थिव थेट स्मशानभूमीत नेऊन अंतिम संस्काराची तयारी सुरू केली. मात्र, दुसरीकडे शवविच्छेदन गृहाबाहेर असलेल्या इतर नातेवाइकांनी जेव्हा विगन दास यांचा चेहरा पाहिला, तेव्हा तो मृतदेह त्यांचा नसल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयाने घाईगडबडीत आणि निष्काळजीपणामुळे विगन दास यांचा मृतदेह दुसऱ्याच कुटुंबाच्या हाती सोपवून स्मशानात पाठवला होता.

हेही वाचा – Bomb Threat: मोठी बातमी! सोमनाथ मंदिर आणि भाजप कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

पोलिसांचा घाईघाईने कॉल; कुटुंबीयांचा तीव्र संताप अन् लेखी तक्रार दाखल

स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तेथे संपर्क साधून विधी थांबवण्याचे आदेश दिले. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता आणि पार्थिव बहुतांश जळाले होते. घाईघाईत चिता विझवण्यात आली असली तरी रुग्णालयाच्या या अक्षम्य चुकीमुळे कुटुंबावर दुहेरी आघात झाला. गावातील शेकडो नागरिक अंतिम दर्शनासाठी वाट पाहत असताना प्रशासनाने हा धक्कादायक घोळ घातला. याप्रकरणी मृत विगन दास यांचे नातेवाईक सुनील कुमार यांनी रुग्णालय प्रशासनाविरुद्ध पोलिसांत लेखी तक्रार नोंदवली असून, दोषी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number