मुंबई : मुंबई शहराला महानगरपालिकेकडून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर इतके पाणी पुरवले जाते. तर पाणीसाठा २ हजार २०० दशलक्ष लिटर इतका आहे. मागील वर्षी सर्व धरणांमध्ये या वेळेला ५०.१८ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. या वर्षीही ७६८,८७४ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा २३ जुलै २०२४ रोजी सकाळी ६ वाजताच्या आकडेवारीनुसार आहे.
जलशयांची नावे :
१) भातसा जलाशय
२)अपर वैतरणा जलाशय
३) मध्य वैतरणा जलाशय
४) मोडकसागर जलाशय
५) तानसा जलाशय
६) तुळशी जलाशय
७) विहार जलाशय
१) भातसा जलाशय
एकूण पाणी साठवण क्षमता – ७१७,०३७ दशलक्ष लिटर
सध्या पाणी साठवण – ३७३,३६१ दशलक्ष लिटर
२)अपर वैतरणा जलाशय
एकूण पाणी साठवण क्षमता – २२७, ०४७ दशलक्ष लिटर
सध्या पाणी साठवण – ४१, ८३७ दशलक्ष लिटर
३) मध्य वैतरणा जलाशय
एकूण पाणी साठवण क्षमता – १९३,५३० दशलक्ष लिटर
सध्या पाणी साठवण – ९१,०१५ दशलक्ष लिटर
४) मोडकसागर जलाशय
एकूण पाणी साठवण क्षमता – १२८,९२५ दशलक्ष लिटर
सध्या पाणी साठवण – ९७, २८७ दशलक्ष लिटर
५) तानसा जलाशय
एकूण पाणी साठवण क्षमता – १४५,०८० दशलक्ष लिटर
सध्या पाणी साठवण – १३२,८१५ दशलक्ष लिटर
६) तुळशी जलाशय
एकूण पाणी साठवण क्षमता – ८,०४६ दशलक्ष लिटर
सध्या पाणी साठवण – ८,०४६ दशलक्ष लिटर
पूर्ण
७) विहार जलाशय
एकूण पाणी साठवण क्षमता – २७,६९८
सध्या पाणी साठवण – २४,४८५
जुलै महिन्याला सुरूवात होताच मुंबई उपनगरात मुसळधार पावसाला सुरू झाली. मुंबईत जुलैमध्ये झालेल्या पावसाने जलाशयांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जलाशयांच्या वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.