“कोणीतरी काही बोललं म्हणून राज्य सरकार निवृत्ती महाराजांना नोटीस पाठवत असेल, तर राज्य सरकारच्या अकलेची कीव करावी वाटते. जर इंदोरीकर महाराजांवर कारवाई केली तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू”, असं म्हणत माजी मंत्री आणि भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी निवृत्ती महाराज यांचे समर्थन केलं आहे. ‘महाराज जे बोलले ते गुरु चरित्रात आहे. मग त्यात गैर कायय़’ असा सवाल धस यांनी केला. ते बीडमध्ये माध्यमांशी बोलत होते.
सुरेस धस यांनी हभप इंदुरीकर महाराजांचं समर्थन केलं आहे. ‘पीसीपीएनडीटी कायदा आणि इंदुरीकर महाराज बोलले याचा काय संबंध आहे?’ असा सवाल त्यांनी केला आहे.
राज्य सरकारने इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवली, याची मला कीव करावीशी वाटते, असं धस म्हणाले.
वारकरी संप्रदायाच्या पताका हाती घेऊन जे कीर्तन करतात, संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांचं कीर्तन ऐकलं जातं, असंही धस म्हणाले.
‘महाराज जे बोलले ते गुरु चरित्र्यामधील आणि पुराणातील सप्रमाण दाखले आहेत. उठ सूट एका धर्माच्या पाठीमागे लागणं योग्य नाही. आधी शनी मंदिर, नंतर इंदुरीकर महाराज यांच्या पाठीमागे लागले आहेत. कोणी काही बोललं म्हणून राज्य सरकारने महाराजांना नोटीस पाठवत असेल, तर राज्य सरकारच्या अकलेची कीव येते.
नोटीसीपेक्षा पुढची कारवाई केली तर अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल. जर कारवाई केली, तर आम्ही 100 टक्के इंदुरीकर महाराजांच्या पाठीमागे राहू. निश्चितपणे आम्ही त्यांची बाजू घेऊट, असं आमदरा सुरेश धस यांनी सांगितलं.