मुंबईतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मलबार हिल परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे.
मलबार हिल येथील निवासी इमारतीला आग लागली आहे. लॅसपालमास या इमारतीला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी ४ अग्निश्मन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.
या आगीत अडकलेल्या ३ जणांना अग्निश्मन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले आहे. दरम्यान या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.