अखेर सत्य बाहेर पडलेच

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘पहाटेचा शपथविधी हा पवारांचा डाव’, असे वक्तव्य केले आहे. यावर दादा भुसेंनी ‘अखेर सत्य बाहेर पडलेच’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांच्या ‘पहाटेचा शपथविधी हा पवारांचा डाव’ या वक्तव्यावर महाराष्ट्रातील नेते दादा भुसे ‘तीन वर्षांनंतर पोटातले हे गुपित त्यांनी उघड केले आहे’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पहाटेच्या शपथविधीची खेळी […]

अखेर सत्य बाहेर पडलेच

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘पहाटेचा शपथविधी हा पवारांचा डाव’, असे वक्तव्य केले आहे. यावर दादा भुसेंनी ‘अखेर सत्य बाहेर पडलेच’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील यांच्या ‘पहाटेचा शपथविधी हा पवारांचा डाव’ या वक्तव्यावर महाराष्ट्रातील नेते दादा भुसे ‘तीन वर्षांनंतर पोटातले हे गुपित त्यांनी उघड केले आहे’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

‘पहाटेच्या शपथविधीची खेळी जाणीवपूर्वक कोणी केली आहे असे म्हणता येणार नाही, मात्र त्यामुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट उठण्यास मदत झाली’. तसेच ‘या घटनेनंतर राष्ट्रवादी भक्कम झाली’, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. ‘पहाटेच्या शपथविधीची खेळी कशी झाली ? का झाली, माहित नाही’, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी केलेला दावा खरा असल्याचे संकेत मिळत आहेत.

तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राजू परुळेकर यांना दिलेल्या मुलाखतीत ‘पवारांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत यायचे होते असे स्पष्टपणे सांगितले होते. इतकेच नव्हे तर, ‘पहाटेचा शपथविधी हा अमित शाह यांच्या निरीक्षणातून घडला’, हे सांगायलाही फडणवीस विसरले नव्हते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number