प्रसिद्ध निर्माता आदिपुरुषची तिकिटे करणार दान

मुंबई, ८ जून,२०२३, प्रतिनिधी : आदिपुरुष या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता द काश्मीर फाईल्स आणि कार्तिकेय या चित्रपटांचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी आदिपुरुष या चित्रपटाची १०,००० तिकिटे दान करणार असल्याचे ठरवले आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवर अधिकृत पोस्ट सामायिक केली आहे. ” ‘आदिपुरुष’ हा चित्रपट सर्वानी साजरा करावा […]

प्रसिद्ध निर्माता आदिपुरुषची तिकिटे करणार दान

मुंबई, ८ जून,२०२३, प्रतिनिधी :

आदिपुरुष या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता द काश्मीर फाईल्स आणि कार्तिकेय या चित्रपटांचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी आदिपुरुष या चित्रपटाची १०,००० तिकिटे दान करणार असल्याचे ठरवले आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवर अधिकृत पोस्ट सामायिक केली आहे.

” ‘आदिपुरुष’ हा चित्रपट सर्वानी साजरा करावा असा आहे. श्रीरामावरील माझी भक्ती आणि श्रद्धा यामुळे मी ‘आदिपुरुष’साठी १०,००० तिकिटे विकत घेण्याचे ठरवले आहे आणि ते तेलंगणातील सरकारी शाळा, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना दान करायचे आहे. जर तुम्हाला तिकिटे मिळवायची असतील तर कृपया खाली दिलेला फॉर्म भरा. ‘जयश्रीराम’ चा जयघोष सर्व दिशांना घुमू दे !”, असा मजकूर त्यांनी लिहिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number