Train Tragedy : टीसीसोबत वाद विकोपाला; नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा ट्रेनमधून पडून मृत्यू

पाटना-आनंद विहार एक्स्प्रेसमध्ये तिकीट वादादरम्यान टीसीने ढकलल्यामुळे आरती यादव यांचा धावत्या ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

Train Tragedy : टीसीसोबत वाद विकोपाला; नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा ट्रेनमधून पडून मृत्यू

उत्तर प्रदेशातील इटावा रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सकाळी घडलेल्या एका रहस्यमय आणि हृदयद्रावक घटनेने प्रवासी सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. पाटना-आनंद विहार सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासणीदरम्यान झालेल्या वादातून नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. टीसीने महिलेला ढकलून दिल्याने ही घटना घडल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे. मृत महिलेची ओळख आरती यादव अशी झाली असून त्या कानपूर देहात येथील रहिवासी होत्या. त्या दिल्लीला औषधोपचारासाठी निघाल्या होत्या, मात्र घाईघाईत चुकीच्या ट्रेनमध्ये चढल्याची शक्यता तपासात व्यक्त होत आहे. भरथाना आणि साहोन स्थानकांच्या मध्यावर हा भीषण प्रकार घडला आणि काही क्षणांतच सर्व काही संपलं.

कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनुसार टीसी संतोष कुमार यांच्याशी तिकीटावरून सुरू झालेला वाद चिघळत गेला. वाद इतका वाढला की टीसीने आधी आरती यांचे सामान खिडकीबाहेर फेकले आणि त्यानंतर धावत्या ट्रेनच्या दरवाजाजवळूनच त्यांना ढकलले, असा आरोप कुटुंबीयांनी पोलिसांसमोर केला आहे. आरती यादव रुळांवर कोसळल्या आणि त्यांचा जागीच प्राण गेला. आरती यांच्या मेहुण्याने, अनिल कुमार यांनी जीआरपीकडे तक्रार दाखल करत संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली. त्यानंतर टीसीवर हत्या या गंभीर गुन्ह्याखाली केस नोंदवण्यात आली.

हेही वाचा: Mumbai Local: मुंबई लोकल वेळापत्रक विस्कळीत होणार? मध्य रेल्वेचा 18 तासांचा ब्लॉक

तपास पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेज, प्रवाशांचे म्हणणे आणि ट्रेनमधील कर्मचार्‍यांचा जबाब या बाबी तपासात महत्त्वाच्या ठरणार आहेत. या सगळ्या पुराव्यांवरूनच आरती यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. आरती यादव यांचे पती अजय यादव हे भारतीय नौदलात सेवेत असून सध्या चेन्नई येथे तैनात आहेत. एका क्षणात सर्व काही उद्ध्वस्त झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रेल्वे सीओ उदय प्रताप सिंह यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून चौकशी जलदगतीने सुरू आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ही घटना प्रवासी सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करते. तिकीट तपासणीच्या नावाखाली प्रवाश्यांवर होणारा गैरवर्तनाचा आरोप हा नव्याने उघड झालेला प्रकार नाही. घटनाक्रमात अनेक प्रसंग असल्याने तपासातील प्रत्येक खुलासा आता या प्रकरणाला नवे वळण देऊ शकतो.

हेही वाचा: Smriti Mandhana: लग्नाची अनिश्चितता… पण स्मृती मानधनाच्या मैदानात परतण्याची तारीख ठरली

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number