द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा आमने सामने

संसद भवनात आणि विविध राज्यांच्या विधानसभेत मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक प्रक्रिया मतपत्रिकेद्वारे पार पडत आहे. एकल संक्रमण पद्धतीनं राष्ट्रपती पदासाठी मतदान पार पडतं. लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करतात. भाजपच्या नेतृत्त्वातील रालोआनं द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर, विरोधी पक्षांनी संयुक्तपणे यशवंत सिन्हा यांना […]

द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा आमने सामने

संसद भवनात आणि विविध राज्यांच्या विधानसभेत मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक प्रक्रिया मतपत्रिकेद्वारे पार पडत आहे. एकल संक्रमण पद्धतीनं राष्ट्रपती पदासाठी मतदान पार पडतं. लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करतात. भाजपच्या नेतृत्त्वातील रालोआनं द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर, विरोधी पक्षांनी संयुक्तपणे यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे. रालोआमधील घटक पक्षांशिवाय बीजेडी, वायएसआर काँग्रेस, बीएसपी, अण्णाद्रमुक, देलगू देसम पार्टी, जनता दल संयुक्त, शिरोमणी अकाली दल, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चानं मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. या पक्षांचा पाठिंबा मिळाल्यानं मुर्मू यांना सिन्हा यांच्याविरुद्ध आघाडी मिळताना दिसत आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. तर, आज होणाऱ्या निवडणुकीत भारतातील खासदार आणि आमदार मिळून ४८०० मतदार मतदान करतील. आज मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर २१ जुलै रोजी मतमोजणी पार पडणार आहे. नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी २५ जुलै रोजी होईल. द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हाच्या परिस्थितीवरून त्यांना सुमारे ५० टक्के मते मिळतील, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आता विविध प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्यामुळे मुर्मू यांना एकूण १० लाख ८६ हजार ४३१ मतांपैकी तब्बल ६ लाख ६७ हजार मते मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number