‘आज लोकशाहीचे संरक्षण झाले’ – देवेंद्र फडणवीस

भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे भाजपच्या १२ आमदारांना मोठा दिलासा मिळाला. भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याची मागणी भाजप नेते करत होते. तसेच यासाठी भाजप आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाने आज १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर विरोधी पक्षनेते […]

‘आज लोकशाहीचे संरक्षण झाले’ – देवेंद्र फडणवीस

भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे भाजपच्या १२ आमदारांना मोठा दिलासा मिळाला.

भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याची मागणी भाजप नेते करत होते. तसेच यासाठी भाजप आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाने आज १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘आज लोकशाहीचे संरक्षण झाले’ असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे.

देवेंद्र फडणवसींनी ट्विट केले की, ‘सत्यमेव जयते! राज्याच्या १२ आमदारंचे निंलबन मागे घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. कुठलेही कारण नसताना एक वर्षाच्या कालावधीसाठी निलंबन करणे हे असंवैधनिक आहे. केवळ कृत्रिम बहुमतासाठी ते करण्यात आले, हे आम्ही सुरूवातीपासूनच सांगत होतो. आज सर्वोच्च न्यायालयानेही तेच सांगितले.’

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे लोकशाहीच्या मूल्यांचे संवर्धन होईल आणि ही असंवैधनिक, अनैति, अयोग्य, बेकायदेशीर आणि अलोकतांत्रिक कृत्य करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला ही मोठी चपराक असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी संगितले आहे. तसेच भाजपच्या १२ आमदारांचे फडणवीसांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number