Crime News: IRS अधिकाऱ्याच्या मुलीला निर्घृणपणे संपवलं; घरातील ‘त्या’ व्यक्तीने काटा काढला?

या प्रकरणात घरातील नोकर राहुल याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून CCTV फुटेजच्या आधारे दिल्ली पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Crime News: IRS अधिकाऱ्याच्या मुलीला निर्घृणपणे संपवलं; घरातील ‘त्या’ व्यक्तीने काटा काढला?

नवी दिल्ली: दक्षिण-पूर्व दिल्लीतील अमर कॉलनी परिसरात एका आयआरएस अधिकाऱ्याच्या मुलीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणीचे वय 22 वर्षे होते. ती अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर UPSC परीक्षेची तयारी करत होती. घरात एकटी असताना तिची हत्या करण्यात आल्याने दिल्लीतील सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. 

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक तपासानुसार, या हत्येमागे घरातील जुन्या नोकराचा हात असल्याचा संशय आहे. राहुल नावाचा हा व्यक्ती राजस्थानचा रहिवासी असून तो सुमारे आठ महिने या कुटुंबाकडे काम करत होता. आर्थिक गैरव्यवहार उघड झाल्यानंतर त्याला दीड ते दोन महिन्यांपूर्वी नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते.

तपासादरम्यान परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये सकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास संशयित राहुल घराजवळ दिसल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या मते, सकाळी साडेसहा ते साडेसात दरम्यान ही हत्या झाली असावी. त्या वेळी आयआरएस अधिकारी आणि त्यांची पत्नी जिमसाठी बाहेर गेले होते, तर मुलगी घरी एकटी होती. राहुलला या दिनक्रमाची पूर्ण माहिती होती.

हेही वाचा: Cabinet Decisions: बायोगॅस धोरण ते IT पार्क; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकासाच्या अनेक योजनांना हिरवा कंदील

प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून तरुणीची हत्या केली. हत्या करण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असण्याचीही शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबतचा अंतिम निष्कर्ष पोस्टमॉर्टेम अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, फॉरेन्सिक पथक आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. आरोपीला पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली असून त्याच्या संभाव्य ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत. पोलिस या प्रकरणात चोरीचा कोणताही हेतू होता का, याचाही तपास करत आहेत. 

हेही वाचा: Paratwada Crime Case : परतवाडा व्हिडिओ प्रकरणातील नराधम अयान अहमदची रस्त्यावरून धिंड; पोलिसांनी शिकवला आरोपीला 'सिंघम' स्टाईल धडा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number