Cyber Fraud: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी हे मोठ्या सायबर फसवणुकीचे बळी ठरले आहेत. सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) खात्यातून तब्बल 55 लाखांची चोरी केली आहे. या प्रकरणाची तक्रार कोलकाता पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाकडे दाखल करण्यात आली असून, तपास सुरू आहे.
बनावट केवायसी
पोलिसांच्या माहितीनुसार, कल्याण बॅनर्जी यांनी 2001 ते 2006 दरम्यान आसनसोल दक्षिणचे आमदार असताना एसबीआयच्या विधानसभा उपशाखेत खाते उघडले होते. अनेक वर्षांपासून हे खाते निष्क्रिय होते. दरम्यान, सायबर गुन्हेगारांनी बनावट आधार आणि पॅन कार्ड वापरून ऑनलाइन केवायसी प्रक्रिया पूर्ण केली, परंतु खासदारांचा खरा फोटो वापरला, जेणेकरून दस्तऐवज अधिक खरे वाटावेत.
हेही वाचा – PUBG वर मैत्री, मुंबईत अत्याचार; लग्नास नकार दिल्याने गुन्हा दाखल; शामलीतून तरुणाला अटक
दरम्यान, 28 ऑक्टोबर रोजी त्यांनी त्या खात्यात नोंदणीकृत मोबाईल क्रमांक बदलला, ज्यामुळे त्यांना संपूर्ण प्रवेश मिळाला. त्यानंतर, गुन्हेगारांनी इंटरनेट बँकिंगद्वारे अनेक ट्रान्सफर्स करून 55 लाख रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले.
बँकेकडून फसवणुकीचा इशारा
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर एसबीआयच्या उच्च न्यायालय शाखेच्या व्यवस्थापकांनी कल्याण बॅनर्जी यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर त्यांनी अधिकृत तक्रार दाखल केली.
हेही वाचा – Surat Viral Video : तरुण पाया पडला, माफी मागितली तरी 'तो' मारत होता; भोलाभाईचे काळे कारनामे कॅमेरात कैद
वृद्ध जोडप्याची 3 कोटींची फसवणूक
काही दिवसांपूर्वी, कोलकात्याच्या बेहला परिसरातील वृद्ध दाम्पत्यालाही सायबर गुन्हेगारांनी 3 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. गुन्हेगारांनी स्वतःला केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी म्हणून सादर केले आणि ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन पैसे उकळले.