Cyber Crime : आधी अर्थमंत्री नंतर टाटा…, सायबर गुन्हेगारांचा नवा डाव उघड! डीपफेक व्हिडीओ तयार करून महिलेचे लाखो रुपये लाटले

पुण्यात सायबर चोरट्यांचा नवा ट्रेंड पाहायला मिळाला आहे. यावेळी डीपफेक व्हिडीओ तयार करून सामान्य नागरिकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Cyber Crime : आधी अर्थमंत्री नंतर टाटा…, सायबर गुन्हेगारांचा नवा डाव उघड! डीपफेक व्हिडीओ तयार करून महिलेचे लाखो रुपये लाटले

पुण्यात सायबर चोरट्यांचा नवा ट्रेंड पाहायला मिळाला आहे. यावेळी डीपफेक व्हिडीओ तयार करून सामान्य नागरिकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावाने डीपफेक व्हिडीओ तयार करून फसवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या नावाने डीपफेक व्हिडीओ तयार करून महिलेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बनावट ‘डीपफेक’ व्हिडीओ तयार करून फसवणूक केल्याच्या घटना समोर आल्यानंतर आता दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या नावाने ‘डीपफेक व्हिडीओ’ तयार करून एका महिलेची 4 लाख 9 हजार 100 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या 38 वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे.

हेही वाचा- Mumbai Crime : 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या घरावर चोराचा डल्ला; 76.39 लाखांचा ऐवज लंपास; आरोपीला बिहारमधून अटक

समोर आलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर रतन टाटा यांचा बनावट व्हिडीओ दाखवून महिलेला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप महिलेने केला. व्हिडीओसोबत दिलेली लिंक उघडल्यानंतर महिलेला ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले होते. यावेळी ‘मधूमोहन’ नावाच्या व्यक्तीने महिलेशी संपर्क साधून चांगला परतावा मिळण्याचे आमिष महिलेला दाखवले होते.

त्यानुसार महिलेने सायबर चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात 4 लाख 9 हजार 100 रुपये जमा केले. मात्र पैसे जमा केल्यानंतर परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. यानंतर कात्रज-आंबेगाव बुद्रुक परिसरातील 38 वर्षीय महिलेने तक्रार नोंदवली, त्यानुसार आता भारती विद्यापीठ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number