प्रवीण दरेकरांना न्यायालयाकडून दिलासा

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. प्रवीण दरेकर यांच्या अटकपूर्व  जामिनावर सोमवारी सुनीवणी होणार असून सोमवारपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे दरेकरांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मजूर प्रकरणी अकटेपासून संरक्षण मिळण्यासाठी प्रवीण दरेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालयाने दरेकरांची याचिका फेटाळून लावली होती. […]

प्रवीण दरेकरांना न्यायालयाकडून दिलासा

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. प्रवीण दरेकर यांच्या अटकपूर्व  जामिनावर सोमवारी सुनीवणी होणार असून सोमवारपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे दरेकरांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

मजूर प्रकरणी अकटेपासून संरक्षण मिळण्यासाठी प्रवीण दरेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालयाने दरेकरांची याचिका फेटाळून लावली होती. मात्र, आज मुंबई सत्र न्यायालयाकडून दरेकरांना दिलासा देण्यात आला आहे. प्रवीण दरेकर यांची अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी सोमवारी होणार असून तोवर त्यांना अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवल्याप्रकरणी भाजप नेते प्रवीण दरेकरांवर कारवाई करण्यात आली. प्रवीण दरेकर यांच्यावर माता रमाबाई आंबेडकर पलीस ठाण्यात भादवी कलम १९९, २००, ४०६, ४१७, ४२०, ४६५, ४६७ आणि १२० (ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आल आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number